...म्हणून प्रियंकाने दिला जुन्या आठवणींना उजाळा

प्रियंका चोप्रा, ऑस्कर २०२० आणि बरचं काही..

Feb 11, 2020, 09:04 AM IST

मुंबई : झगमगत्या दुनियातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा ऑस्कर २०२० पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मानाच्या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. पण जगातील प्रसिद्ध व्यक्तीच्या यादीत असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस या सोहळ्यात उपस्थित नव्हती. ऑस्कर २०२० पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू न शकल्यामुळे तिने आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत २०१६ आणि २०१७ सालच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. 

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये 'मला यंदाच्या वर्षी ऑस्कर सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही. पण तुमच्या सर्वांसोबत घरी बसून या सोहळ्याचा आनंद घेत आहे.' असं लिहिलं आहे. अशा आशयाचं ट्विट करत तिने तुम्ही कोणासाठी उभे राहाल? असा प्रश्न उपस्थित केला. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

1/8

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8