"तुमचा मित्र गौतम अदानी हा संसदेपेक्षा मोठा आहे का? मोदीजी एवढे का चिडलात?"
Priyanka Gandhi Attacks PM Modi: काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी थेट अदानींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. प्रियंका यांनी आपला संताप व्यक्त करताना काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
1/8
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील नोटीस लोकसभेच्या सचिवांनी जारी केली आहे. 'मोदी अडनाव' प्रकरणात सुरत न्यायालयाने दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा राहुल यांना सुनावल्यानंतर कायद्याचा आधार घेत राहुल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमुळे काँग्रेसच्या माजी सचिव आणि राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.
2/8
प्रियंका गांधींनी आधी एका ट्विटमध्ये निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोकसी यांनी केलेल्या घोटाळ्याची आकडेवारी मांडली आहे. ज्यांनी देशाला लुटलं त्यांना वाचवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे का? याचा तपास का केला जात नाही? जे प्रश्न विचारतात त्यांच्यावरच खटले दाखल केले जात आहेत. भाजपा भ्रष्टाचाऱ्यांचं समर्थन करते का? असे प्रश्न प्रियंका यांनी विचारले आहेत.
3/8
प्रियंका गांधींनी संसदेमध्ये झालेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारला. यामध्ये त्यांनी थेट मोदींना टॅग केलं आहे. "नरेंद्र मोदीजी एका शहीद पंतप्रधानांच्या मुलाला तुमच्या चमच्यांनी देशद्रोही, मीर जाफर म्हटलं. राहुल गांधींचे वडील कोण आहेत असा प्रश्न तुमच्या एका मुख्यमंत्र्याने विचारला. काश्मीरी पंडितांच्या परंपरांचं पलन करताना एका मुलाचा, पित्याचा मृत्यू झाल्यानंतर तो जबाबदारी स्वीकारतो. आपल्या कुटुंबांची परंपरा कायम ठेवतो. संपूर्ण संसदेसमोर तुम्ही संपूर्ण कुटुंब आणि काश्मीरी पंडितांचा अपमान करताना, नेहरु नाव का नाही ठेवत. मात्र तुम्हाला कोणत्याही न्यायाधिशाने दोन वर्षांची शिक्षा दिली नाही. तुमची खासदारकी रद्द करण्यात आली नाही," अशी आठवण प्रियंका गांधींनी मोदींना टॅग करत करुन दिली.
4/8
तसेच अदानींचा उल्लेख करत प्रियंका यांनी मोदींना लक्ष्य केलं. "अडानींकडून होणाऱ्या लुटीसंदर्भात राहुलने एका खऱ्या देशभक्तांप्रमाणे प्रश्न विचारले. नीरव मोदी, मेहूल चौक्सी यांच्याविरोधात प्रश्न विचारले. तुमचा मित्र गौतम अदानी देशाच्या संसदेपेक्षा आणि भारतातील महान जनतेपेक्षा अधिक मोठा झाला आहे का? ज्यामुळे त्याच्या लुटीसंदर्भात प्रश्न विचारला तर तुम्ही एवढे चिडलात?" असा प्रश्न प्रियंका यांनी आपल्या ट्वीटमध्ये विचारला.
5/8
प्रियंका यांनी मोदींना गांधी घराणं कोणासमोर झुकत नाही असंही मोदींना सुनावलं आहे. "आमच्या नसांमध्ये जे रक्त आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर, हुकूमशाहांसमोर आम्ही कधीच झुकत नाही आणि कधी झुकणार ही नाही. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करु शकता," असं थेट आव्हान प्रियंका गांधींनी दिलं आहे.
6/8