डोकं भांबावून सोडणारा दाक्षिणात्य मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट, पाहून तुम्हीही व्हाल सुन्न

विकेंड मूड आहे आणि अशात तुम्ही ही ओटीटीवर काय पाहायचं असा विचार करत असाल तर त्यासाठीचे काही ऑप्शन्स आपण जाणून घेऊया... यावेळी असे काही दाक्षिणात्य चित्रपट आहेत.. या चित्रपटात तुम्हाला मिस्ट्री, सस्पेंस आणि सायको किलरची स्टोरी पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत टीव्ही समोरून उठू शकणार नाहीत. 

| Aug 31, 2024, 16:35 PM IST
1/7

ओटीटीवर पाहण्यासाठी जर तुम्ही कोणता चित्रपट किंवा वेब स्टोरी शोधत असाल तर आता तुम्हाला अनेक ऑप्शन इथे मिळणार आहेत. त्यातही सस्पेंस, थ्रिलर आणि मिस्ट्रीसारखं काही पाहायचं असेल तर मग तुमच्यासाठी हे योग्य ऑप्शन्स आहेत. चला कोणते चित्रपट पाहू शकता...

2/7

त्यात तमिळ चित्रपट 'पोर थोझिल' आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि ओटीटीवर लोकांना हा चित्रपट पाहायला आवडेल. हा चित्रपट तुम्हीही 'सोनी लिव्ह' या ओटीटी अॅपवर पाहू शकता. 

3/7

'पोर थोझिल' चा इंग्रजी अर्थ हा 'द आर्ट ऑफ वॉर' आहे. हा एक तमिळ थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट एका सीरियल किलरवर बनवण्यात आला आहे. या सीरियल किलरचा शोध दोन पोलिस ऑफिसर एकत्र मिळून करताना दिसत आहे. 

4/7

'पोर थोझिल' च्या कास्टविषयी बोलायाचे झाले तर सरथकुमार, अशोक सेलवन आणि निखिला विमल, सरथ बाबू, निजलगल रवि, सुनील सुखदा आणि संतोष कीझट्टूर आहे. 

5/7

चित्रपटाला विग्नेश राजानं दिग्दर्शक केलं आहे तर अल्फअरेड प्रकाशसोबत मिळून या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. 

6/7

'पोर थोझिल' मध्ये एका मुलाला पोलिसाची नोकरी मिळते. त्याची ती पहिलीच केस होती. त्याला केस कशी सोडवतात हे शिकवण्यासाठी त्याला त्या ऑफिसरसोबत ठेवतात. चैन्नईत जिथे तीन मुलींची निघृण हत्या करण्यात येते त्या ठिकाणी ते दोघं जातात. 

7/7

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुली या 25-30 वर्षांच्या होत्या. आता शहरात सगळे घाबरलेले असताना ही केस सोडवण्याचा सगळे प्रयत्न करतात. पुढे जाऊन असं काही होतं की तुमचाही विश्वास बसत नाही. लक्षवेधी गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत कोण किलर आहे याचा अंदाज बांधता येत नाही.