PHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल

जम्मू - काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) करण्यात आला

Feb 15, 2019, 11:59 AM IST
1/9

सेनेच्या ताफ्यावर हल्ला

सेनेच्या ताफ्यावर हल्ला

सेनेच्या ताफ्यात (convoy) ७८ वाहनांचा समावेश होता. यामध्ये तब्बल २५०० जवान प्रवास करत होते

2/9

सीआरपीएफचे जवान निशाण्यावर

सीआरपीएफचे जवान निशाण्यावर

बसमध्ये सीआरपीएफच्या ७६ बटालियनचे जवान होते

3/9

३५० किलो स्फोटकांचा वापर

३५० किलो स्फोटकांचा वापर

हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटकांचा वापर केला होता. सीआरपीएफचा ताफा जात असलेल्या एका कारमध्ये ही स्फोटके भरून ठेवण्यात आली होते

4/9

अवंतीपोरा भागात आत्मघातकी हल्ला

अवंतीपोरा भागात आत्मघातकी हल्ला

श्रीनगरपासून अवघ्या ३० किलोमीटर दूर अंतरावर अवंतीपोरा बागात दहशतवाद्यांनी या ताफ्यावर पहिल्यांदा गोळीबार केला. स्फोटकांनी भरलेली एक 'एसयूव्ही' गाडी जवानांच्या एका बसवर धडकली... आणि मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात एका बसचे आणि त्यातून प्रवास करणाऱ्या जवानांचे अक्षरश: तुकडे-तुकडे उडाले

5/9

आयईडी स्फोट

आयईडी स्फोट

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांना निशाण्यावर घेत हा आयईडी स्फोट घडवून आणण्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात होता. या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय

6/9

स्थानिक दहशतवादी

स्थानिक दहशतवादी

हा एक आत्मघातकी हल्ला होता. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यानं हा हल्ला घडवून आणला. धक्कादायक म्हणजे, आदिल हा अवघ्या २१ वर्षाचा तरुण काश्मीरचा स्थानिक रहिवासी होता 

7/9

आत्मघाती हल्ल्याचा व्हिडिओ

आत्मघाती हल्ल्याचा व्हिडिओ

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ल्याचा एक व्हिडिओही जारी केला आहे

8/9

वकासचा व्हिडिओ समोर

वकासचा व्हिडिओ समोर

जैश ए मोहम्मदनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, दक्षिण काश्मीच्या काकपोरा भागात राहणारा वकास जैशच्या झेंड्यासमोर बसलेला दिसतोय. त्याच्यासमोर ग्रेनेड आणि अत्याधुनिक रायफल ठेवलेल्या दिसत आहेत. या व्हिडिओची सुरुवात करताना वकास म्हणतोय, 'जेव्हापर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचेल तेव्हापर्यंत मी जन्नतमध्ये मजा करायला पोहचलो असेल. मी जैश ए मोहम्मदमध्ये दहशतवाद्याच्या रुपात एक वर्ष काम केलं आणि काश्मिरच्या जनतेसाठी हा माझा शेवटचा मॅसेज असेल' 

9/9

खोऱ्यात हायअलर्ट

खोऱ्यात हायअलर्ट

या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे