कौतुकास्पद ! आईच्या आठवणीत मुलांनी घरासमोर उभारलं जन्मदातीचं स्मारक

Mother memorial : पुण्यातल्या दोन भावंडांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ घरासमोरच आईचे स्मारक उभारले आहे. गोळे बंधुंनी फायबरपासून बनवलेला आईचा हुबेहूब पुतळा घराच्या अंगणात स्थापन केला आहे  

Apr 10, 2023, 19:02 PM IST
1/7

pune rahibai gole memorial

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नांद गावातील दोघा भावांनी आईच्या स्मरणार्थ घरासमोर आईच स्मारक उभारलं आहे. दिवंगत आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा बनवून, घरासमोच्या अंगणात त्याची स्थापना केली आहे. 

2/7

gole borther mother rahibai

यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी या कृतीने समाजासमोर आदर्श ठेवलाय. परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.

3/7

gole brother

गोळे बंधुंच्या मातोश्री कै. राहीबाई गोळे यांचे वर्षाभरापूर्वी कोरोनामुळे बाणेर येथे निधन झाले होते. निधनानंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. परंतुआई विषयी असणारे प्रेम,श्रद्धा,भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरा समोरच मंदिर उभारून त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

4/7

Rahibai memorial

कै. राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असनाऱ्या पती दत्तात्रय गोळे यांचे सोबत 45 वर्ष सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले.

5/7

rahibai gole

कै.राहीबाई या कुटुंबावरच प्रेम करुन थांबल्या नाहीत. तर त्यांचे नातेवाईक आणि गावासाठी असणारे प्रेम, आपुलकी आजही ग्रामस्थ आणि सगेसोयरे बोलून दाखवत आहेत.

6/7

rahibai gole pune memorial

8 एप्रिल रोजी गोळे कुटुंबियांनी कै.राहीबाई गोळे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी होम हवन,महाप्रसाद, हभप नेहाताई साळेकर यांचे किर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

7/7

rahibai gole memorial

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांचे हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी बीडी गायकवाड,सरपंच प्रिती गोळे,नातेवाईक,नांद गावातले आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.