पंडित नेहरुंपासून ते डोनाल्ड ट्रम्पपर्यंत... दलाई लामांच्या वक्तव्यांमुळे याआधी झालाय मोठा वाद

Dalai Lama controversy : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा हे सध्या नव्या वादात अडकले आहेत. दलाई लामा यांनी एका मुलासोबत केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर दलाई लामा यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. पण दलाई लामांच्या वक्तव्यांबाबत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकदा वादात सापडले असून नंतर त्यांनी माफी मागितली आहे.

Apr 10, 2023, 17:00 PM IST
1/6

dalai lama

87 वर्षीय दलाई लामा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून महिला उत्तराधिकाऱ्यापर्यंत अनेक विधाने केली आहेत. त्यांच्या विधानांमुळे अनेकदा वाद निर्माण झालाय. अनेकदा त्यांनी याबाबत माफी देखील मागितली आहे.

2/6

dalai lama on boy kissing

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात दलाई लाला यांनी एका लहान मुलाच्या आधी ओठांवर चुंबन घेतलं आणि त्यानंतर स्वत:ची जीभ बाहेर काढत "माझी जीभ चोखतोस का?," असं विचारलं होतं. वाद वाढल्यानंतर त्यांनी याबाबत माफी मागितली होती.

3/6

dalai lama on female lama

2019 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, दलाई लामा म्हणाले होते की, जर एखादी महिला लामा आली आणि ती आनंदी दिसली तर इतर लोकही तिला पाहून आनंदित होतील. पण जर महिला लामा दु:खी दिसल्या तर लोकांना त्यांना बघायला आवडणार नाही.

4/6

dalai lama on trump

दलाई लामा यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "अमेरिका फर्स्ट" या घोषणेबद्दलही टीका केली होती. तसेच ही घोषणा चुकीची आहे असेही म्हटले होते. एखाद्या दिवशी ते काहीतरी बोलतात, दुसऱ्या दिवशी ते काहीतरी बोलतात, पण मला वाटते नैतिक तत्त्वाचा अभाव आहे, असे दलाई लामा म्हणाले होते.

5/6

dalai lama on europe

दलाई लामा यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यावरुन भाष्य केले होते. युरोप युरोपियन लोकांचे आहे म्हटल्यावर या वादाला तोंड फुटले होते. स्वीडनमधील माल्मो येथे एका परिषदेत बोलताना दलाई लामा म्हणाले की निर्वासितांनी त्यांच्या मूळ देशात परतले पाहिजे.

6/6

dalai lama on pandit jawaharlal nehru

ऑगस्ट 2018 मध्ये, दलाई लामा म्हणाले की होती, मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पाहण्याची महात्मा गांधींची इच्छा पूर्ण झाली असती तर भारताची फाळणी झाली नसती. जवाहरलाल नेहरूंची आत्मकेंद्रित वृत्ती ही मोहम्मद अली जिना यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करू शकली नाही.