पुण्यातील प्रमुख गणेश मंडळे 6 नंतर येणार मिरवणुकीत, विलंब टाळण्यासाठी कशी केलीय व्यवस्था? सर्वकाही जाणून घ्या

Pune Ganesh Visarjan:श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सायंकाळी 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ संध्याकाळी 6.30 वाजता मिरवणुकीत सहभागी होईल. हुतात्मा बाबू गेनू गणपती ट्रस्ट 6.45 ला मिरवणुकीत सहभागी होईल. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट 7 वाजता तर अखिल मंडई मंडळ सायंकाळी 7.30 वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 

| Sep 27, 2023, 14:10 PM IST

Ganesh Visarjan:विलंब टाळण्यासाठी मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचे नियोजन केले आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यंदा मिरवणूक वेळेत संपवण्याचा प्रयत्न गणेश मंडळांकडून करण्यात आला आहे.  

1/8

पुण्यातील प्रमुख गणेश मंडळे 6 नंतर येणार मिरवणुकीत, विलंब टाळण्यासाठी कशी केलीय व्यवस्था? सर्वकाही जाणून घ्या

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

Ganesh Visarjan: हिंदु धर्मशास्त्रानुसार गणेश विसर्जन सुर्यास्ताच्या आधी होणे अपक्षित असते. पण पुण्यातील अनेक प्रमुख मंडळे दुसऱ्या दिवशी पहाटे गणेश विसर्जन करतात. गेल्या काही वर्षात यामध्ये अनेक प्रमुख मंडळांची भर पडली आहे. गेल्यावर्षी अलका चौकात एकाचवेळी अनेक गणेश मंडळे आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

2/8

इतर मंडळांची नाराजी

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विसर्जन मिरवणूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या. मोठ्या गणेश मंडळांच्या मुरवणुकीमुळे विलंब झाल्याने इतर मंडळांच्या नाराजीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदाची मिरवणूक कशी हाताळली जाईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

3/8

नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचे नियोजन

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

विलंब टाळण्यासाठी मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचे नियोजन केले आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यंदा मिरवणूक वेळेत संपवण्याचा प्रयत्न गणेश मंडळांकडून करण्यात आला आहे. 

4/8

एका मिरवणुकीपुढे तीनच ढोल-ताशा पथके

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

यासाठी एका मिरवणुकीपुढे तीनच ढोल-ताशा पथके असावीत, विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांची संख्या कमी असावी, प्रत्येक चौकातील वादनाचा डाव टाळून मिरवणूक लवकर संपवावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

5/8

सर्वांची सहकार्याची भूमिका

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पाच गणपती मिरवणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच त्यानंतरचे प्रमुख मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला जागा करून देण्यात येणार आहे. या संदर्भात इतर मंडळांशी चर्चा झाली असून, सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. 

6/8

मिकवणुकीत सहभाग

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सायंकाळी 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ संध्याकाळी 6.30 वाजता मिरवणुकीत सहभागी होईल. हुतात्मा बाबू गेनू गणपती ट्रस्ट 6.45 ला मिरवणुकीत सहभागी होईल. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट 7 वाजता तर अखिल मंडई मंडळ सायंकाळी 7.30 वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 

7/8

तीन चौकात वादनासाठी परवानगी

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

गणपती विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि वेळेत आटोपण्यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांकडून गणेश मंडळांना ढोल-ताशा पथकांना बेलबाग, उंबऱ्या गणपती (शगुन) आणि टिळक चौक या केवळ तीन चौकात वादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंडळांना या तीन चौकात अवघे दहा मिनिटे वादन करता येणार आहे.

8/8

स्पीकर आणि लेझर लाइट लावणाऱ्यांविरोधात गुन्हे

Pune Ganesh Visarjan Pramukh Ganapati  mandals Miravnuk Know everything

इतर कोणत्याही चौकात; तसेच विसर्जन मार्गावर पथकांना रेंगाळता येणार नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्पीकर आणि लेझर लाइट लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.