PHOTOS: हे सोनू सूदच करू शकतो! सामान्य भक्तांप्रमाणे गर्दीतून मार्ग काढत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

  गणेशोत्सव आणि त्यातही मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे त्याची गोष्टच काही और असते. भाविक तासंतास रांगेत उभे राहून लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यास उत्सुक असतात. 

Sep 27, 2023, 13:53 PM IST

'लालबागचा राजा' च्या पाया पडण्यासाठी तर सिनेसृष्टिही जमते. पण या अभिनेत्यांना सर्रास VIP किंवा VVIP दर्शन दिले जाते. अभिनेता सोनू  सूदनं  मात्र राजाच्या दर्शनासाठी असं दर्शन घेणं टाळल्याचं दिसतंय. 

1/8

सोनू सूद मंगळवारी मुंबईतील लोकप्रिय लालबागचा राजा येथे पोहोचला. यावेळी त्यांची पत्नी सोनाली सूदही उपस्थित होती.  

2/8

सर्वसामान्य लोकांना बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत असताना कलाकारांना व्हीआयपी दर्शनाची सोय आहे.   

3/8

याबद्दल अनेक लोकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तर काही कलाकार हे VIP दर्शन न घेता गर्दीत रांगेत उभे राहणं पसंत करतात.  

4/8

सोनू सूद, त्याची पत्नी, अभिनेता शेखर सुमन आणि त्यांची आई, कोरिओग्राफर फराह खान हे सर्वसामान्यांच्या रांगेतून ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेताना दिसले.   

5/8

बॉलीवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरही  बाप्पाच्या दर्शनासाठी आईसोबत गर्दीत उभी होती. सर्वसामान्य लोकांसोबत उभं राहून त्यांच्या समस्या समजून घेत तिनं बाप्पाचं दर्शन घेतलं.  

6/8

7/8

सध्या या कलाकाराचे व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याचे कौतुक करत आहे.   

8/8

बाकिच्या सेलिब्रिटींनी त्याच्याकडून शिकावं अशा कमेंटही या व्हिडिओवर नेटकरी करत आहेत.