Indian Railway: हिंदीमध्ये काम करणे कर्तव्य... हिंदीच्या प्रसारासाठी भारतीय रेल्वे विभागाच्या सूचना

Indian Railway: हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात हिंदीचा जास्तीतजास्त वापर करावा, असा आग्रह भारतीय रेल्वेने धरला आहे

Mar 20, 2023, 17:44 PM IST

Pune Railway: काही महिन्यांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा वापर करण्याचं आवाहन देशवासीयांना केल्यामुळे पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध प्रादेशिक भाषा असा वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हे वास्तव अनेकदा अधोरेखित करून दाखवलं जाऊ लागलं असलं तरी शासनाकडून हिंदीचा आग्रह धरला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

1/6

indian railway train

भारतीय रेल्वेच्या पुणे विभागाने हिंदी भाषेबाबत केलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सातारा, मिरज, कोल्हापूर, पुणे या स्थानकांवरील सर्व शाखा अधिकारी आणि स्थानक राजभाषा कार्यान्वयन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

2/6

hindi language

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक विभागीय कार्यालयात झाली. या बैठकीत इंदू दुबे यांनी हिंदीच्या प्रचार आणि प्रसारासाठी रेल्वेकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. 

3/6

railway office

दैनंदिन वापरात रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहजसोप्या हिंदीचा वापर करावा. हिंदीमध्ये काम करणे हे आपले कर्तव्य आहे, असे दुबे यांनी म्हटले आहे.

4/6

government office

तसेच कार्यालयीन कामकाजात हिंदीचा वापर वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे, असे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रजेशकुमार सिंह यांनी सांगितले.  

5/6

hindi book

यासोबत बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी हिंदी पुस्तक दालनांची स्थिती सुधारण्याची मागणी केली आहे.   

6/6

Stubbornness of Hindi language

त्यामुळे आता रेल्वे विभागाकडून हिंदी भाषेचा हट्ट केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना हिंदीचा वापर वाढवण्याचा सूचना दिल्या आहेत.