कोरोनामुळे प्रसिद्ध गायकाचं निधन, चाहत्यांवर शोककळा

Feb 24, 2021, 15:42 PM IST
1/5

1991 साली आलेल्या त्यांचा 'हुस्ना डी मलको' अल्बमने जगभरात ख्याती मिळवली. या अल्बमच्या 5.1 दशलक्ष सिडी विकल्या गेल्या. गाण्यांशिवाय त्यांनी बर्‍याच चित्रपटांत अभिनयातून नाव कमावले. 'जग्गा डाकू' या पंजाबी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.  

2/5

सरदुल सिकंदर यांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. त्याचा पहिला अल्बम 1980 मध्ये आला होता. 'रोडवेज द लारी' असे या अल्बमचे नाव होते. यानंतर, त्यांनी बरेच अल्बम काढले आणि मागे वळून पाहिले नाही. 

3/5

गेल्या महिन्यात ते किडनीच्या समस्येने ग्रस्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी, त्यांचे मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. ऑपरेशन यशस्वी झाले, परंतु त्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागणही झाली. यानंतर त्यांच्यावर कोरोनावर उपचार सुरू होते.

4/5

मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

5/5

पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्‍याच दिवसांपासून आजारी होते.