Maruti Suzuki कडून Swift चं नवं मॉडेल लॉन्च

Feb 24, 2021, 13:57 PM IST
1/4

Swift चं नवं मॉडेल लॉन्च

Swift चं नवं मॉडेल लॉन्च

Maruti Suzuki  ने Swift चे नवीन मॉडेल ३ वर्षांनी लॉन्च केले आहे. कारच्या इंटीरियरमध्ये कोणताही खास बदल केलेला नाही. पण नव्या मॉडेलच्या आउटलुकवर जास्त प्रमाणात काम केले आहे. काही बदल केल्यानंतर नवीन मॉडेल हे खूप आकर्षक वाटत आहे.

2/4

बेस मॉडेलची किंमत 6 लाखापेक्षा कमी

बेस मॉडेलची किंमत 6 लाखापेक्षा कमी

Swift च्या नव्या मॉडेलची सुरूवातीची किंमत ही 5.73 लाख रूपये इतकी आहे. तसेच टॉप मॉडेलची किंमत 8.41 लाख रूपये एवढी आहे. ही किंमत दिल्लीच्या एक्स शोरूमच्या प्रमाणे आहे. दुसऱ्या शहरामध्ये  या कारच्या किंमतीमध्ये थोडा बदल असू शकतो.

3/4

नव्या Swift चं इंजिन

नव्या Swift चं इंजिन

Swift चे नवीन मॉडेलमध्ये 'k' सिरीज सोबत 1.2L Dual Jet Dual VVT इंजिन दिले गेले असून ते इंजिन आइडल  स्टार्ट स्टॉप (Start stop) या फिचर सोबत आहे. कंपनीच असं म्हणणं आहे की, या नवीन मॉडेलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

4/4

माइलेज अतिशय दमदार

माइलेज अतिशय दमदार

Maruti Suzuki या कंपनीचा असा दावा आहे की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही कार चांगल मायलेज देईल.  कंपनीच्या मॅन्यूअल वेरिएंट 23.20 किलोमीट प्रति लीटर  आणि ऑटोमॅटिक वेरिएंटनुसार 23.76 किलोमीटर प्रति लीटर माइलेज देईल.