भारताच्या 18 वर्षीय प्रज्ञाननंदची बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक; 32 वर्षीय कार्लसनला चितपट करणार?

R Praggnanandhaa World Cup Chess Final :क्रिकेट सोडून इतर खेळांकडेही लक्ष द्या, कारण हे खेळाडूही वाखाणण्याजोगी कामगिरी करताना दिसत आहेत. 

Aug 22, 2023, 07:46 AM IST

R Praggnanandhaa World Cup Chess Final : भारतीय क्रीडा क्षेत्रात सध्या आशिया चषक आणि त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आणखी एका क्रीडा प्रकारातही भारताचं नाव उंचावलं आहे. 

1/8

R Praggnanandhaa

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

R Praggnanandhaa World Cup Chess Final : क्रिकेट सोडून इतर खेळांकडेही लक्ष द्या, कारण हे खेळाडूही वाखाणण्याजोगी कामगिरी करताना दिसत आहेत. 

2/8

बुद्धिबळाचा डाव

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

निमित्त ठरतोय तो म्हणजे भारतातील 18 वर्षीय ग्रँडमास्टर रमेशकुमार प्रज्ञाननंद आणि त्याच्या बुद्धिबळाचा डाव. 

3/8

ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

सोमवारी ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनं अजरबैजान येथे सुरु असणाऱ्या बाकूमध्ये फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या फॅबियानो कारुआनावर मात करत थेट अंतिम सामन्यात धडक मारली. 

4/8

आर. प्रज्ञाननंद

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

आर. प्रज्ञाननंद आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 32 वर्षीय मॅग्नस कार्लसन याच्या आव्हानाला सामोरा जाणार असून, त्याच्या बुद्धिचातुर्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.  प्रज्ञाननंद कार्लसनला चितपट करतो का हे पाहणं यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे. 

5/8

हे यश सध्या वैश्विक स्तरावर चर्चेचा विषय

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

प्रज्ञाननंदचं हे यश सध्या वैश्विक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे, कारण विश्वनाथन आनंद यांच्यानंतर बुद्धिबळाच्या विश्वचषकामध्ये अंतिम सामना गाठणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. अंतिम सामना गाठण्यासाठी त्यानं टायब्रेकरनं कारूआनावर 3.5-2.5 अशी मात केली. 

6/8

आत्मविश्वास वाखाणण्याजोगा

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

सध्या आपण या क्षेत्रातील स्थान अबाधित ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करत असून, स्पर्धेत त्याच मार्गानं प्रदर्शन करत असल्याचं प्रज्ञाननंद म्हणाला. या स्पर्धेतही त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. उपांत्य सामन्याआधी त्यानं जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या हिकारू नाकामूराला पराभूत केलं होतं. 

7/8

प्रज्ञाननंदचे अनेक फोटो व्हायरल झाले

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

सोशल मीडियावर प्रज्ञाननंदचे अनेक फोटो व्हायरल झाले. या साऱ्यामध्ये त्याच्या आईवरही अनेकांच्या नजरा खिळल्या. कारण, लेकाचं यश पाहून त्यांचेही डोळे पाणावले होते.   

8/8

तुमचं याबाबत काय मत?

R Praggnanandhaa Indias Grandmaster To Face Magnus Carlsen In World Cup Chess Final

अनेकांच्या गर्दीत प्रज्ञाननंदभोवती असणारा गराडा पाहताना त्यांनाही भरून आलं. जिथं देशात काही क्रीडा प्रकारांना वाजवीहून जास्त प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्याचा मान मिळतो तिथं असे खेळ आणि असे खेळाडूही प्रकाशझोतात आले पाहिजेच हेच प्रकर्षानं जाणवतं. तुमचं याबाबत काय मत?