रोमिओ-ज्युलियट कायदा नेमका आहे तरी काय? 18 वर्षांखालील लैगिंक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळणार?

भारतात लवकरच रोमियो-ज्युलियट कायदा लागू होणार आहे. सुप्रीम कोर्टात तशी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Aug 21, 2023, 23:36 PM IST

What is Romio Juliet Law :  18 वर्षांखालील अल्पवयीन मुला-मुलींसोबत शारीरिक संबंध हा कायदेशीर गुन्हा आहे. अगदी आपापसातील सहमतीनं अल्पवयीन मुलं-मुली देखील असे सेक्स संबंध ठेवू शकत नाहीत.  या कायद्याला रोमिओ-ज्युलिएट (Romeo Juliet Law) नाव देण्यात आलं असून या कायद्याबाबत देशभरात वाद सुरु आहे.  

1/9

16 ते 18 वयोगटातील मुलामुलींनी आपापसातील संमतीनुसार लैंगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा ठरता कामा नये, अशी मागणी याचिकाकर्ते हर्ष विभोर सिंघल यांनी केलीय. पाश्चात्य देशांच्या धर्तीवर भारतातही रोमियो-ज्युलियट कायदा लागू करावा, अशी मागणी आता पुढं आली आहे. 

2/9

आरोग्य मंत्रालयानं 25 ते 49 या वयोगटातील महिलांचा सर्व्हे केला. त्यापैकी 10 टक्के महिलांनी वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले तर 39 टक्के महिलांनी 18 वय होण्यापूर्वीच पहिल्यांदा लैंगिक संबंधांचा अनुभव घेतला, असं सर्व्हेत आढळलं असा दावा याचिकर्त्या वकिलांनी केला. 

3/9

अलिकडच्या काळात किशोरवयीन मुलामुलींमधील लैंगिक संबंध वाढीला लागलेत.

4/9

2007 नंतर जगातील अनेक देशांमध्ये हा कायदा लागू झाला आहे.  

5/9

स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवणा-या मुलामुलींमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये, असंही या कायद्यात म्हटलंय.

6/9

स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा मानला जाणार नाही. 

7/9

16 वर्षांवरील किशोरवयीन मुलामुलींमध्ये विचार करण्याची क्षमता असते त्यामुळं 16 ते 18 या वयोगटातील मुलं-मुली स्वच्छेने शारीरिक संबंध ठेवू शकतात. 

8/9

अल्पवयीन मुला-मुलींनी सेक्ससंबंध ठेवले आणि मुलगी गरोदर राहिली तर संबंधित किशोरवयीन मुलाला बलात्काराच्या आरोपाखाली जेलची सजा होऊ शकते, असा पोक्सो कायदा सांगतो.

9/9

18 वर्षांखालील अल्पवयीन मुला-मुलींसोबत शारीरिक संबंध हा कायदेशीर गुन्हा आहे. अगदी आपापसातील सहमतीनं अल्पवयीन मुलं-मुली देखील असे सेक्स संबंध ठेवू शकत नाहीत.