RAF, CISF, CRPF च्या तुकड्या महाराष्ट्रात दाखल

May 18, 2020, 14:46 PM IST
1/3

केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ५ तुकड्या , CISF च्या ३ तुकड्या आणि CRPF च्या २ तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. या एका तुकडीत १०० जवान आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे २० तुकड्या मागितल्या होत्या. पण केंद्राकडून १० तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. या तुकड्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे तैनात करण्यात येणार आहेत.  

2/3

कोरोनामुळे राज्यातील पोलिसांवरचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला पाचारण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे तशी मागणी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

3/3

रमजान ईद, पालखी सोहळा, गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी या तुकड्या राज्याने मागवल्या होत्या. या जवानांना कुठे तैनात करायचे याचा अधिकार पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे.