Birthday Special: बॉल टॅम्परिंग, धक्काबुक्की आणि..., 'या' वादांमध्ये हमखास घेतलं जातं राहुल द्रविडचं नाव

टीम इंडियामध्ये शांत खेळाडू म्हटले की, राहुल द्रविडचं नाव हमखास घेतलं जातं. द्रविड अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू म्हणुन ओळखले जातात. पण असे काही वाद आहेत, ज्यामध्ये द्रविड यांच्या नावाचा उल्लेख होतो.  

Jan 11, 2024, 13:54 PM IST

 

 

1/7

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविड यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये इंदूरला झाला होता. शांत रहाणाऱ्या या खेळाडूचं अनेकदा वादमध्ये नाव जोडलं गेलंय.  

2/7

2007 साली ग्रेग चॅपल टीम इंडियाचे प्रमुख कोच होते. त्यावेळी टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सौरव गांगुलीच्या हाती होती. याच काळात ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद उघडपणे समोर आला होता. या वादामध्ये राहुल द्रविड यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. कोचिंग पॉवरचा वापर करून चॅपल यांनी गांगुलीला टीमबाहेर काढलं. सौरव गांगुलीच्या एका विधानानुसार, ग्रेग चॅपेलच्या निर्णयाविरोधात राहुल द्रविड काहीच बोलला नव्हता आणि हीच त्याची चूक होती.   

3/7

राहुल द्रविडची ओळख एक शांत क्रिकेटपटू म्हणून आहे. क्रिकेटच्या मैदानात कधीही तो चिडचिड करताना किंवा संतापताना दिसला नाही. मात्र 2004 साली पाकिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात त्याचा रूद्र अवतार चाहच्यांना दिसला. झालं असं की, द्रविड रन घेत असताना शोएब अख्तरसोबत धक्काबुकी झाली होती.   

4/7

यावेळी शोएब अख्तर आणि राहुल द्रविड यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. अखेरीस अंपायर आणि इतर खेळाडूंनी प्रकरण शांत केलं.  

5/7

2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध घडलेल्या या घटनेने अनेक जण हैराण होते. मुलतान टेस्ट मॅचमध्ये वीरेंद्र सेहवागने त्रिशतक झळकावल्यानंतरच कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला. त्यावेळी सचिन तेंडुलकर 194 रन नाबाद खेळत होता, त्यावेळी त्याला द्विशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 6 रनची गरज होती.   

6/7

वीरेंद्र सेहवागच्या त्रिशतकानंतर राहुल द्रविडने भारताचा पहिला डाव 5 विकेटवर 675 धावांवर घोषित केला होता. हे पाहून सचिन तेंडुलकरलाही आश्चर्य वाटले. या सामन्यानंतर राहुल द्रविडवर बरीच टीका झाली होती.  

7/7

राहुल द्रविडवर बॉल टॅम्परिंगचाही आरोप लावण्यात आला होता 2004 मध्ये ऑस्ट्रेलियातील ट्राई सीरीजदरम्यान ब्रिस्बेनमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात राहुल द्रविडवर बॉलवर जेली लावण्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी रेफरी क्लाइव्ह लॉईड कडून द्रविडला दंड ठोठावण्यात आला होता.