"मी मोदींच्या डोळ्यात भीती पाहिली, ते घाबरले आहेत", राहुल गांधींची 5 मोठी विधानं

Rahul Gandhi Press Conference: सूरत कोर्टाने (Surat Court) मोदींच्या (Modi) आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने तात्काळ ही कारवाई केली. यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत काही महत्त्वाची विधानं केली.   

Mar 25, 2023, 14:50 PM IST
1/6

Rahul Gandhi Press Conference: सूरत कोर्टाने (Surat Court) मोदींच्या (Modi) आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने तात्काळ ही कारवाई केली. यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत काही महत्त्वाची विधानं केली.   

2/6

मी प्रश्न विचारत राहणार:  अदानी यांच्या शेल कंपन्या आहेत. त्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक आहे. ते पैसे कोणाचे आहेत? अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते जुने आहे. नियमात बदल करुन विमानतळ अदानी यांना देण्यात आले. याबाबत मी सभापतींना अनेक पत्रेही लिहिली आहेत. लोकसभा सभागृहात मला बोलू का दिले जात नाही? यानंतर काय झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे? मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. मोदी आणि अदानी यांचे नाते काय? ते 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत, हे मी सातत्याने विचारत राहणार आहे असं राहुल गांधी म्हणाले. 

3/6

देशाच्या लोकशाहीवर हल्ला:  देशाच्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. संसेदत मंत्री माझ्याविरोधात खोटं बोलले. त्यांनी म्हटलं की, मी परदेशातून मदत मागितली. मी असं काही म्हटलं नव्हतं. संसदेतील माझं भाषण हटवण्यात आलं. पण मी घाबरणारा नाही. मी प्रश्न विचारत राहणार. 

4/6

मोदी आणि अदानी यांच्यात जुनं नातं:  नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्याच फार जुनं नातं आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हे नातं आहे. मी विमानात बसलेला त्यांचा फोटो दाखवला होता. ते आपल्या मित्रासह अत्यंत निवांत बसले होते. 

5/6

मी मोदींच्या डोळ्यात भीती पाहिली:  अदानीसंबंधी मी केलेल्या भाषणानंतर पंतप्रधान घाबरले आहेत. मी त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली आहे. यासाठी त्यांनी त्यावरुन लक्ष हटवलं आणि आता माझी खासदारकी रद्द केली. 

6/6

माफी मागायला मी सावरकर नाही:  माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाही. संसदेत मी बोलू देण्याची विनंती केली होती. मी दोनवेळा पत्रही लिहिलं होतं. मी लोकसभा अध्यक्षांची जाऊन भेट घेतली आणि तुम्ही लोकशाहीचे संरक्षणकर्ते आहात, बोलू द्या असं सांगितलं. त्यावर ते हसत आपण करु शकत नाही असं म्हटलं. त्यावर मी मग तुम्ही नाही करु शकत, तर मग कदाचित जाऊन नरेंद्र मोदींना भेटावं लागेल. ते तर हे होऊ देणारच नाहीत.