वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक येथून सुटणाऱ्या 950 पेक्षा जास्त ट्रेन रद्द; मध्य रेल्वेवर 63 तासांचा ब्लॉक...

मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जम्बो हाल होणार आहेत.. प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण आणि रुंदीकरणासह दुरूस्तीच्या कारणांसाठी रेल्वे प्रशासनानं हा जम्बोब्ल़ॉक घेतला आहे. मध्य रेल्वेवरील 930 लोकल फे-या रद्द होणार आहेत. 

| May 31, 2024, 00:43 AM IST

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जम्बो हाल होणार आहेत.. प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण आणि रुंदीकरणासह दुरूस्तीच्या कारणांसाठी रेल्वे प्रशासनानं हा जम्बोब्ल़ॉक घेतला आहे. मध्य रेल्वेवरील 930 लोकल फे-या रद्द होणार आहेत. 

1/8

मध्य रेल्वेच्या या जम्बो ब्लॉकमुळे मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.. त्यामुळे मध्य रल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. 

2/8

सीएसएमटी स्टेशनवर 36 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधी  शुक्रवार मध्यरात्री 12.30 पासून ते रविवार दुपारी 12.30 पर्यंत आहे. 

3/8

मुंबईकरांनी गरज असेल तरच लोकल प्रवास करावा, असं आवाहन रेल्वेनं केलंय.

4/8

मेगाब्लॉकच्या कालावधीत कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम द्यावं. इतर कोणत्याही मार्गाने काम करण्याची संधी द्यावी

5/8

मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडूनही प्रवासी आणि आस्थापनांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय..

6/8

72 मेल/एक्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत  

7/8

वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक इथून अनेक मेल/एक्स्प्रेस आणि मुंबई लोकल शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट रूट केल्या जाणार आहेत.

8/8

930 लोकल फे-या रद्द होणार आहेत. 890 लोकल फे-या अंशतः रद्द.