Rental Girlfriend in India: रेन्टनं गर्लफ्रेंड ते ही भारतात! कॉफी पिण्यापासून फिरण्याचेही रेट कार्ड, लोक म्हणाले- भांडी घासायचे किती घेशील?

या पोस्टमध्ये तरुणीने स्वत:चा फोटो लावून विचारलंय की, कोणी सिंगल असेल आणि डेटवर जाऊ इच्छित असेल तर मला भाड्याने घेऊ शकता. विविध कामांसाठी तिने रेटकार्ड जारी केलंय. 

| Jun 07, 2024, 15:46 PM IST

Rental Girlfriend in India: या पोस्टमध्ये तरुणीने स्वत:चा फोटो लावून विचारलंय की, कोणी सिंगल असेल आणि डेटवर जाऊ इच्छित असेल तर मला भाड्याने घेऊ शकता. विविध कामांसाठी तिने रेटकार्ड जारी केलंय. 

1/12

रेन्टनं गर्लफ्रेंड ते ही भारतात! कॉफी पिण्यापासून फिरण्याचेही रेट कार्ड, लोक म्हणाले- भांडी घासायचे किती घेशील?

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

Instagram Rental Girlfriend: इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. एका मुलीची इन्स्टाग्रामची एक पोस्ट व्हायरल होतेय. ज्यामध्ये तरुणीने स्वत:ला भाड्याने देण्याची घोषणा केलीय. या पोस्टमध्ये तरुणीने स्वत:चा फोटो लावून विचारलंय की, कोणी सिंगल असेल आणि डेटवर जाऊ इच्छित असेल तर मला भाड्याने घेऊ शकता. विविध कामांसाठी तिने रेटकार्ड जारी केलंय. 

2/12

भेटण्यासाठी 3 हजार रुपये

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

तरुणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रेट कार्ड शेअर केलंय. त्यानुसार तुम्हाला चिल कॉफीसह मला डेट करु इच्छित असाल तर 1500 रुपये, साध्या डेटसाठी ज्यात रात्रीचे जेवण आणि सिनेमा असेल त्यासाठी 2000 रुपये, कुटुंबाला भेटण्यासाठी  3 हजार रुपये मोजावे लागतील.

3/12

डेटवर घेऊन जाण्यासाठी 4 हजार रुपये

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

एखाद्या कार्यक्रमाला सोबत घेऊन जाण्यासाठी 3 हजार 500, बाईकवरुन डेटवर घेऊन जाण्यासाठी 4 हजार रुपये, आपल्या डेटबद्दल सोशल मीडियात पोस्ट करण्यासाठी 6 हजार रुपये,  हायकिंग, कयाकिंग वगैरे काही खास करायचं असेल तर त्यासाठी 5000 रुपये वेगळे लागतील असं तिने म्हटलंय.  

4/12

स्वयंपाक करायचा असेल तर 3500 रुपये

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

जर तुम्हाला घरी एकत्र स्वयंपाक करायचा असेल तर 3500 रुपये लागेल, शॉपिंगला न्यायचे असेल तर 4500 रुपये, विकेंडच्या मीटिंगसाठी 10,000 रुपये लागतील असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.  

5/12

सल्ले द्यायला सुरुवात

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

अशा या पोस्टनंतर लोकांनी तिला सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. या पोस्टवर लोकांनी तरुणीची खिल्ली उडवली जातेय. तू स्वतःबद्दल काय समजतेस? असा प्रश्न तिला विचारला जातोय. 

6/12

झाडू कटका करायचे किती रुपये घेशील?

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

बहुतांशजण तिची खिल्ली उडवत बाथरूम स्वच्छ करण्यासाठी किती पैसे घेशील? झाडू कटका करायचे किती रुपये घेशील? असा प्रश्न विचारत आहेत. 

7/12

असाइनमेंट करण्यासाठी किती पैसे घेशील?

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

तर काहीजण इन्स्टाग्राम सोडण्याचे किती रुपये घेशील असेही विचारताय. एका युजरने तिला विचारले आहे की, तू अभ्यास करत असशील तर मला सांग की असाइनमेंट करण्यासाठी किती पैसे घेशील? 

8/12

मुलींचं भविष्यात काय होईल?

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

या तरुणीची पोस्ट पाहून लोकांना तिच्याबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत.  या मुलींचं भविष्यात काय होईल? ही पोस्ट पाहून मुलीच्या वडिलांना काय वाटेल? अशी भीतीही अनेकजण व्यक्त करत आहेत.   

9/12

कठोर शब्दात टीका

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

इंस्टाग्रामवर कोणता नवीन व्यवसाय सुरू झाला आहे का जिथे मुली त्यांचे दर ठरवतात? पूर्वी लोक माल विकण्यासाठी इंस्टा वापरत होते, आता ते स्वत: विकू लागले आहेत, अशा कठोर शब्दातही लोकं टीका करत आहेत. 

10/12

14 मिलियनहून अधिक व्ह्यूज

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

तरुणीच्या रीलला आतापर्यंत 14 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 14 हजार लोकांनी लाइक केले आहे. 5000 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. 

11/12

सुरुवातीला फक्त 6-7 हजार व्ह्यूज

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

विशेष म्हणजे मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुरुवातीला फक्त 6-7 हजार व्ह्यूज मिळाले होते, नंतर हळूहळू हे व्ह्यूज 28-30 हजारांपर्यंत वाढू लागले. 

12/12

फॉलोअर्सचा आकडा देखील वाढला

Rental Girlfriend in India Divya Giri Instagram Viral Post Troll Marathi News

एवढेच नव्हे तर जेव्हा तिने ही पोस्ट टाकली तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सचा आकडा देखील वाढला आहे. त्यामुळे हे सर्व इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी चाललंय असं लोकांचं ठाम मत बनत चाललंय.