15 व्या शतकातला किल्ला, भोवताली जगातील दुसरी सर्वात लांब भिंत; लाखो पर्यटकांचे बनलाय आकर्षण

| May 30, 2024, 16:59 PM IST
1/10

15 व्या शतकातला किल्ला, जगातील दुसरी सर्वात लांब भिंत; लाखो पर्यटकांचे बनलाय आकर्षण

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

भारतातील महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांमध्ये कुंभलगड किल्ल्याचे नाव घेतले जाते. हा किल्ला अतिशय प्राचीन असून याला समृद्ध इतिहास आहे. 

2/10

524 वर्षांपूर्वी बांधण्यात आला

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

कुंभलगड किल्ला 524 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या किल्ल्याची भिंत ही जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे. त्याला भारताची ग्रेट वॉल म्हणतात. 

3/10

उदयपूरपासून 48 किलोमीटर

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

हा किल्ला राजस्थानमध्ये असून 15 व्या शतकात राणा कुंभाने बांधला होता. हा किल्ला उदयपूरपासून 48 किलोमीटर अंतरावर आहे.

4/10

सर्वात लांब भिंत

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

कुंभलगड किल्ल्याची भिंत 36 किमी लांब आहे. चीनच्या भिंतीनंतरची ही सर्वात लांब भिंत आहे. कुंभलगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे.

5/10

समुद्रसपाटीपासून 1,100 मीटर उंचीवर

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

हा किल्ला राजस्थानातील चित्तोडगड नंतरचा दुसरा सर्वात मोठा किल्ला आहे. कुंभलगड किल्ला अरावली पर्वतरांगेत आहे आणि समुद्रसपाटीपासून 1,100 मीटर उंचीवर आहे.

6/10

भिंत 15 फूट रुंद

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

या किल्ल्याची भिंत 15 फूट रुंद आहे. महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्ल्यात झाला. 

7/10

7 दरवाजे

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

कुंभलगड किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत. किल्ल्याच्या परिसरात अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत.

8/10

लाइट अँड साउंड शो

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

या किल्ल्यात पर्यटकांना लाइट अँड साउंड शो पाहता येतो. यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागेल. 

9/10

आकर्षक प्रकाश व्यवस्था

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

रात्रीच्या वेळी किल्ल्यावरील अंधार दूर करण्यासाठी आकर्षक प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. 

10/10

मेवाडच्या राज्यकर्त्यांचे प्रतीक

Rajsthan Kumbalgarh Fort india Great Wall India tourism Marathi News

हा किल्ला मेवाडच्या राज्यकर्त्यांचे प्रतीक आहे. त्याच्या सामर्थ्यामुळे, हा भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक मानला जात असे.