वाट चुकलेल्या भावांना...; सुषमा अंधारे यांच्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2023 : या सणाच्या निमित्तानं काही प्रसिद्ध चेहरेही मागं राहिलेले नाहीत. अगदी कलाजगतापासून राजकीय वर्तुळापर्यंत प्रत्येक ठिकाणी रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.   

Aug 30, 2023, 09:57 AM IST

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या निमित्तानं सध्या बहीण- भावाच्या नात्याला एक वेगळीच किनार मिळाली आहे. अतिशय सुरेख पद्धतीनं हा सण साजरा करण्याला प्रत्येक बहीण आणि भावाची जोडी प्राधान्य देत आहे. 

1/8

शुभेच्छांचं निमित्तं

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

वाट चुकलेल्या भावांना...; सुष्मा अंधारे यांच्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा   

2/8

सणाचा उत्साह

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

रक्षाबंधनाच्या सणाचा हाच उत्साह पाहता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही त्यांच्या भावंडांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   

3/8

'फारयब्रँड'

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

सुषमा अंधारे यांची ओळखच मुळातच 'फारयब्रँड' अशी असल्यामुळं त्यांनी इथं त्यांच्याच शैलीत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे असाच प्रश्न अनेकांना पडत आहे.   

4/8

हे भाऊ कोण?

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

X या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत वाट चुकलेल्या भावांचा उल्लेख जरा स्पष्टच केला. आता हे भाऊ कोण? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचंही उत्तर अंधारे यांनी दिलं.   

5/8

राखी पौर्णिमा

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

'...आणि कुठल्याही बहिणीला आपला भाऊ राखी पौर्णिमेला सोबत असावा असं मनापासून वाटतं...' असं लिहित त्यांनी या शुभेच्छांची सुरुवात केली.   

6/8

महाराष्ट्रभर महाप्रबोधन

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

'महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करताना आम्ही विरोधक म्हणून भूमिका न मांडता भाऊ म्हणून भूमिका मांडत राहिलो. कारण यातील काहींनी निश्चितपणे अक्षम्य असा अपराध केला आहे', असंही त्यांनी इथं अधोरेखित केलं.   

7/8

नकळत चुका घडल्या

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

'काहींच्या हातून नकळत चुका घडल्या आहेत आणि चुका दुरुस्त होऊ शकतात. असो.. आमच्या सगळ्याच भावंडांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, वाट चुकलेल्या भावांना सन्मार्गाचा रस्ता सापडो हीच सदिच्छा', असं म्हणत त्यांनी सर्वांनाच योग्य मार्गावर येण्याच्या शुभेच्छा दिल्या.   

8/8

चुकलेल्या भावांची यावर काय प्रतिक्रिया?

raksha bandhan 2023 Sushma Andhare shares a sarcastic post on the festive mode

अंधारे यांनी दिलेल्या शुभेच्छा पाहता त्यांच्या सर्व वाट चुकलेल्या भावांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.