रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार
Ram Temple: दररोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील. येत्या 4-5 महिन्यांत मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि मनुष्यबळाची मागणी यावरुन रोजगाराची कल्पना करता येईल असे सांगितले जात आहे.
Ram Temple Tourism Jobs: राम मंदिरात दर्शन सुरू झाल्यानंतर सुमारे 20,000 नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. अयोध्येत येत्या काही वर्षांत दररोज अंदाजे 3-4 लाख भाविक येतील. त्यामुळे याचे जागतिक पर्यटन केंद्रात रूपांतरित होईल, असे रँडस्टॅड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशब गिरी यांनी सांगितले.