'मी चांगला पती नाही...', लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी Ranbir Kapoor चा मोठा खुलासा

Ranbir Kapoor and Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लोकप्रिय कपल आहे. त्या दोघांच्या लग्नाला आज 14 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण झालं. त्यांनी गेल्यावर्षी म्हणजेच 2022 साली लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या.   

Diksha Patil | Apr 14, 2023, 18:51 PM IST
1/7

आज त्या दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवल आहे. पण लग्नाच्या पहिल्याच दिवशी रणबीरनं आपल्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. 

2/7

रणबीरच्या मते तो आलियासाठी चांगला पती नाही. रणबीरनं केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. 

3/7

रणबीरननं नुकतीच फ्री प्रेस जर्नलला मुलाखत दिली. यावेळी रणबीत त्याच्या आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलला आहे. 'आपण सगळं चांगलं करत आहोत असं आपल्याला वाटतं असतं, पण आपल्या आयुष्यात कधीच सगळं परिपूर्ण नसतं.'

4/7

पुढे रणबीर म्हणाला, 'मला वाटत नाही की मी एक चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला पती आहे. पण मला चांगल होण्याची इच्छा आहे. जो पर्यंत आपल्याला याची जाणीव होत नाही तो पर्यंत आपण योग्य मार्गावर येत नाही. '

5/7

आलिया आणि रणबीरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले, तर त्यांनी घराच्या गॅलरीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. 

6/7

दरम्यान, 6 नोव्हेंबर 2022 रोजी आलियानं मुलगी राहाला जन्म दिला. रणबीर आणि आलियानं दिलेल्या या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला.

7/7

त्या दोघांच्या कामविषयी बोलायचे झाले तर रणबीरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. लवकरच तो प्रोजेक्ट्समध्ये रश्मिका मंदान्नासोबत ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात दिसणार. तर आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात दिसणार. त्यासोबत ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (All Photo Credit : Alia Bhatt Instagram)