Randeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न

Randeep Hooda Wedding Photo: रणदीप हुड्डासाठी हा प्रवास खास असणार आहे कारण इथं त्याला एका खास व्यक्तीची साथही मिळत आहे. 

Nov 30, 2023, 07:45 AM IST

Randeep Hooda Wedding Photo: अभिनयाच्या बळावर आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या अभिनेता रणदीप हुड्डा यानं एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 

1/7

रणदीप हुड्डा

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

Randeep Hooda Wedding Photo: प्रेमाच्या नात्याला कायमस्वरुपी नाव देत अभिनेता रणदीप हुड्डा यानं अभिनेत्री लिन लॅशराम हिच्याशी लग्नगाठ बांधली.   

2/7

पारंपरिक लूक

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

मणिपुरी पद्धतीनं त्याचा आणि लिनचा विवाहसोहळा पर पडला. यावेळी रणदीपनं शुभ्र वस्त्र परिधान केले होते. सोनेरी किनार असणारा एक फेटा त्याच्या लूकला चार चाँद लावत होता.   

3/7

पारंपरिक मणिपुरी वधू

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

लिनविषयी सांगावं तर, तिचा लूक पारंपरिक मणिपुरी वधुसारखा होता. संस्कृती जपत या जोडीनं सहजीवनाच्या शपथा घेतल्या. यावेळी लिन सोन्याच्या दागिण्यांमध्ये सुरेख दिसत होती. 

4/7

मणिपुरी संस्कृती

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

लिन मुळची मणिपूरची असल्यामुळं या विवाहसोहळ्यामध्ये मणिपुरी संस्कृतीचं सुरेख दर्शन घडलं. किंबहुना अनेकांनी पहिल्यांदाच असा एखादा सोहळा पाहिला. 

5/7

लग्नातील फोटो

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

अतिशय पारंपरिक पद्धतीनं हा विवाहसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पार पडला. ज्यानंतर या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मडियावरून समोर आले. 

6/7

आनंदाची बातमी

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

खुद्द रणदीप हुड्डानंही लग्नातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही आंदाची बातमी दिली. 

7/7

बोलकं कॅप्शन

Randeep Hooda lin laishram Wedding Photos

आजपासून आम्ही एकच आहोत... असं अतिशय मोजक्या शब्दांत पण, बोलकं कॅप्शन त्यानं या फोटोंना दिलं. (छाया सौजन्य- रणदीप हुड्डा/ इन्स्टाग्राम)