बलात्कार करणार्‍यांना या देशांमध्ये दिली जाते अशी कठोर शिक्षा

Jan 05, 2021, 15:46 PM IST
1/5

खरं तर, इंडोनेशियाने एक सरकारी मॅन्युअल मंजूर करून आपल्या विवादास्पद कायद्याला आणखी बळकटी दिली. ज्यानंतर आता असे गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. या कायद्यानुसार दोषींना इंजेक्शनद्वारे शिक्षा दिली जाईल. ज्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी होतात आणि त्यांच्या लैंगिक इच्छा संपतात. बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना अशा कठोर शिक्षेसाठी इंडोनेशियाने आधीच नियम तयार केले आहेत.

2/5

याव्यतिरिक्त, सौदी अरेबियामध्ये इस्लामिक शरिया कायद्यास मान्यता देण्यात आली आहे. येथे जर एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचा दोषी आढळल्यास त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर खासगी भागाला कापण्याची शिक्षा ही होऊ शकते.  

3/5

अफगानिस्तान, इराक आणि इराणमध्ये बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जातो. चेक रिपब्लिकमध्ये ही सर्जिकल कास्ट्रेशनचा कायदा आहे. येथे दोषींवर शस्त्रक्रिया करुन त्यांना नपुसंक केलं जातं. अनेक मानवाधिकार कार्यकर्ता या कायद्याचा विरोध करतात.

4/5

चीनमध्ये ही बलात्काऱ्याला मृत्यूदंड दिला जातो. चीनमध्ये मेडिकल टेस्टनंतर दोषीला सरळ फासावर लटकवण्यात येतं.

5/5

नायजेरिया सरकारने काही दिवसांपूर्वी अशा गुन्हेगारांना नपुसंक बनवण्याचा निर्णय घेतला होता. 14 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या पीडितवर बलात्कार झाला असेल तर दोषीला येथे फाशी दिली जाते.