Rashami Desai कास्टिंग काऊचची शिकार ! एकटं बोलावलं, ड्रिंक्समध्ये नशेच्या गोळ्या टाकल्या अन्...

Rashami Desai Casting Couch : छोट्या पडद्यावर असू द्या किंवा मग मोठ्या पडद्यावर कधी ना कधी कोणता कलाकार समोर येऊन कास्टिंग काऊचविषयी बोलतो. यात अभिनेत्री रश्मि देसाईचे (Rashami Desai)  देखील नाव आहे. तिनं देखील करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा सामना केला होता. त्याचा खुलासा रश्मिनं केला आहे.   

Feb 24, 2023, 18:32 PM IST
1/5

Rashami Desai Casting Couch

रश्मिनं उतरन या मालिकेतून लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकेनं रश्मिचं आयुष्य बदललं. पण तिला हे सगळं इतक्या सहजासहजी मिळालं नाही. मात्र, रश्मिनं या मालिकेत काम करण्याआधी खूप स्ट्रगल केलं होतं. रश्मिनं कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे. 

2/5

Rashami Desai Casting Couch

रश्मिनं लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या कुटुंबात किंवा ओळखीत कोणी अभिनय क्षेत्रात नव्हतं म्हणून तिला सुरुवातीला खूप स्ट्रगल करावं लागलं. वयाच्या 16 व्या वर्षी रश्मिला ऑडिशनसाठी फोन आला होता. इतकंच काय तर तिला एकटं येण्यास देखील सांगितलं होतं. 

3/5

Rashami Desai Casting Couch

जेव्हा रश्मि ऑडिशन देण्यासाठी कॅमेऱ्यात पोहोचली तेव्हा की खूप घाबरली तेव्हा तिथे असलेल्या एका व्यक्तीनं तिच्या ड्रिंकमध्ये गोळ्या मिळवल्या. त्यानंतर समोरच्या व्यक्तीनं रश्मिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जाणवताच रश्मिनं त्या व्यक्तीला स्पष्ट सांगितले की हे सगळं करण्यासाठी तिचा नकार आहे आणि ती करणारही नाही.

4/5

Rashami Desai Casting Couch

हे सगळं घडताच रश्मि अखेर तिथून निघाली आणि घरी जाताचं तिनं हे सगळं प्रकरण आईला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रश्मिची त्या व्यक्तीकडे गेली आणि मग त्याची मारहान केली. 

5/5

Rashami Desai Casting Couch

रश्मिनं तपस्या या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर तिला तप्पू म्हणून प्रेक्षक ओळखू लागले होते. रश्मिनं त्यानंतर तिचा सहकलाकार नंदीश संधूसोबत लग्न केलं. मात्र, तिचं वैवाहिक आयुष्य हे अपयशी ठरलं.