Rashmika-Vijay : साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय नॉट रिचेबल? Photo मुळे चर्चांना उधाण

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Photos : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर चर्चेत आली. या दरम्यान दोघांचा लेटेस्ट व्हॅकेशन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय लाइमलाइटमध्ये आले आहेत. 

| Jan 15, 2024, 10:29 AM IST

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या बातम्यांनंतर आता सोशल मीडियावर एंगेजमेंटच्या अफवा पसरल्या आहेत. रश्मिका आणि विजयच्या एंगेजमेंटच्या अफवांदरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर अशी चर्चा सुरु आहे की, दोन्ही कलाकार एकत्र  व्हिएतनाममध्ये गुपचूप सुट्टी घालवत आहेत.

1/5

रश्मिका-विजय

Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam

विजय देवराकोंडा यांनी आठवड्याभरापूर्वी सोशल मीडियावर त्याच्या ताज्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये अभिनेता ब्लॅक आणि ग्रे टी-शर्टसह निऑन बीनी कॅपमध्ये दिसला होता. आणि त्यांच्या या फोटोमागे बाजार दिसत होता.

2/5

रश्मिका-विजय

Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam

विजय देवरकोंडाने या आपल्या लेटेस्ट फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, जेव्हा तुम्हाला लाफ्टर फिट येते... विजय देवरकोंडाच्या या फोटोवर  नेटिझन्सने अनेक कमेंट केल्या आहेत. 

3/5

रश्मिका-विजय

Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam

तर आता रश्मिका मंदान्नाने तिच्या लेटेस्ट व्हिएतनाम ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री पारंपरिक व्हिएतनामी कॅप घातलेली दिसत आहे. रश्मिका मंदान्नाने तिच्या लेटेस्ट फोटोंसोबत कॅप्शनही दिली आहे.

4/5

रश्मिका-विजय

Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam

रश्मिका मंदान्नाने फोटोंना कॅप्शन दिले आहे की, ती या टोपीने इतकी प्रभावित झाली की तिला माझ्यासोबत घरी यावं लागलं. रश्मिका मंदान्नाच्या लेटेस्ट व्हेकेशन ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5/5

रश्मिका-विजय

Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या व्हिएतनाम सहलीचे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर, नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की, दोन्ही कलाकार एकत्र सुट्टी घालवत होते. मात्र, रश्मिकाच्या फोटोंमध्ये विजय दिसत नाही आणि विजयच्या फोटोंमध्ये रश्मिकाही दिसत नाही.