Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला पाहून चाहत्यांना आठवली उर्फी जावेद! तुम्हीच पाहा PHOTO

Rashmika Mandanna : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी कपड्यांमुळे उर्फी जावेद नव्हे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चर्चेत आली आहे. यावेळी रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक फारसा आवडला नाही. तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. युजर्सनी सांगितले की, तुम्हीही उर्फी बनत आहेस का?

Mar 01, 2023, 13:05 PM IST
1/5

दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) रविवारी मुंबईत झालेल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये हॉट स्टाईलमध्ये दिसली. रश्मिकाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती.  

2/5

अनेकदा अवॉर्ड फंक्शन्समध्ये रश्मिका साडी किंवा सूटमध्ये असायची. मात्र, यावेळी ती वेगळ्या अंदाजात दिसली आहे. रश्मिकाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस डाउन स्लीव्हज घातला होता. 

3/5

अनेकदा अवॉर्ड फंक्शन्समध्ये रश्मिका साडी किंवा सूटमध्ये असायची. मात्र, यावेळी ती वेगळ्या अंदाजात दिसली आहे. रश्मिकाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस डाउन स्लीव्हज घातला होता. 

4/5

तसेच, ड्रेसच्या मागील बाजूस लॉग लाइन होती. शिवाय तिने हिल्स घातल्या होत्या. मात्र रश्मिकाचा बोल्ड लूक चाहत्यांना फारसा आवडलेला दिसत नाही.  

5/5

कारण रश्मिकाच्या चाहत्यांनी उर्फीची स्टाईल कॉपी केल्याचे म्हटले आहे. रश्मिका तिच्या या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.