मॉर्फ व्हिडीओमुळे रश्मिका मंदाना अडचणीत; कसे तयार केले जातात असे व्हिडीओ?

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा आणखी एका मुलीचा व्हिडिओ आहे जो एडिट करण्यात आला असून त्यात रश्मिका मंदानाचा चेहरा लावण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीपफेकची चर्चाही सुरू झाली आहे.

Nov 06, 2023, 17:06 PM IST
1/7

deepfake AI

डीपफेक ही नवीन संज्ञा नसून गेल्या काही वर्षांपासून डीपफेकच्या माध्यमातून लोकांचे मोठे नुकसान होत आहे. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स वापरणे सोपे झाले आहे. डीपफेकसाठी एआय तंत्रज्ञान वापरले जाते. सायबर गुन्हेगार लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी डीपफेकचा वापर करत आहेत.

2/7

rashmika mandanna viral video

रश्मिका मंदानाचा हा व्हिडीओमध्ये चेहरा अगदी ओरिजिनल दिसावा अशा पद्धतीने एडिट करण्यात आला आहे. परंतु व्हिडिओमधील लिप सिंक चुकीचे आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर हा बनावट व्हिडिओ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

3/7

deepfake meaning

डीपफेक हा शब्द डीप लर्निंगमधून आला आहे. डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा एक भाग आहे. नावामध्ये डीप म्हणजे अनेक स्तर आहेत आणि ते आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कवर आधारित आहे. या अल्गोरिदममध्ये, बनावट कॉन्टेंटमध्ये भरपूर डेटा एडिट करून खोट्या फोटोला खरं केलं जातं

4/7

deepfake app

आजकाल अनेक डीपफेक अॅप्स प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. जरी हे अॅप्स डीपफेक बनवण्याचा दावा करत नाहीत, पण हे अॅप्स फोटोंचे भाव बदलतात, एखाद्याचा चेहरा काढून टाकतात आणि दुसरा लावतात, शरीराचा आकार बदलतात आणि व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा आवाज देखील जोडतात.

5/7

deepfake video

डीपफेकची अनेक उदाहरणे तुम्ही दररोज इंटरनेटवर पाहतात, परंतु याचे ज्ञान नसल्यामुळे खरं खोटं लोकांना कळत नाही. रोजच्या वापरात फोटो एडिट करण्यासाठी वापरणारे अॅप्स देखील डीपफेक तंत्रज्ञानावर आहेत. तुमच्या जवळचं उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पंतप्रधानांच्या गाण्याचे व्हिडीओ देखील डीपफेकचे उदाहरण आहे.

6/7

deepfake tool

डीपफेक व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात आधी ज्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचे खरे फोटो आणि व्हिडिओ डीपफेक व्हिडिओ बनवण्यासाठी तयार केलेल्या टूलमध्ये टाकले जातात. येथे एन्कोडर आणि डिकोडर वापरलं जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या फोटो आणि व्हिडिओला अॅनलाईज करते.

7/7

AutoEncoder Encoder and Decoder

एन्कोडर इमेजला लहान डेटामध्ये आणतो. कॉम्प्रेसिंग केलेला डेटा पुन्हा ओरिजनल स्वरुपात आणणे हे डीकोडरचे काम आहे. कॉम्प्रेशन आणि डीकंप्रेशन व्यतिरिक्त, ऑटोएनकोडर नवीन इमेज तयार करू शकतो, आवाज आणू शकतो आणि डोळ्यांच्या हालचालींपासून भुवयांपर्यंत सर्व प्रकारचे लहान तपशील एडिट करू शकतो.