प्रायव्हेट व्हिडीओ-MMS कसे लीक होतात? 'ही' चूक तुम्ही करत नाहीत ना!

Private video MMS leaked Reasons: तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरी होणे किंवा हॅक होणे हे प्रमुख कारण आहे. हॅकर्स तुमचा स्मार्टफोन, क्लाउड स्टोरेज किंवा मेसेजिंग अॅप्स ऍक्सेस करू शकतात. 

| Nov 07, 2023, 10:08 AM IST

Digital Safety अनेकदा लोक मोबाईलवरुन खासगी व्हिडीओ किंवा मल्टीमीडिया मेसेज (MMS) शेअर करतात. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला डिजीटल युगाचे एक कटु वास्तव माहिती असायला हवे. MMS आणि व्हिडीओ लीक कसे होतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

1/12

प्रायव्हेट व्हिडीओ-MMS कसे लीक होतात? 'ही' चूक तुम्ही करत नाहीत ना!

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

Digital Safety: मोबाईल हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. पेमेंट, मेल, मेसेजिंगसह सर्वच कामे आपण मोबाईलवरुन करु लागलो आहोत. 

2/12

डिजीटल युगाचे एक कटु वास्तव

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

अनेकदा लोक मोबाईलवरुन खासगी व्हिडीओ किंवा मल्टीमीडिया मेसेज (MMS) शेअर करतात. मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला डिजीटल युगाचे एक कटु वास्तव माहिती असायला हवे. MMS आणि व्हिडीओ लीक कसे होतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/12

डेटा चोरी आणि हॅकिंग

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरी होणे किंवा हॅक होणे हे प्रमुख कारण आहे. हॅकर्स तुमचा स्मार्टफोन, क्लाउड स्टोरेज किंवा मेसेजिंग अॅप्स ऍक्सेस करू शकतात. यामुळे ते तुमचा खासगी कंटेंट चोरून ते व्हायरल देखील करू शकतात.

4/12

रिव्हेंज पॉर्न

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

आधी रिलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये नंतर भांडणे झाल्यास त्यातील वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती बदला घेतात.  रागाच्या भरात खासगी व्हिडिओ आणि एमएमएस लीक केले जातात. त्याला रिव्हेंज पॉर्न असे नाव देण्यात आले आहे. अशी प्रकरणे ब्रेकअप आणि प्रेमात फसवणूकीदरम्यान घडतात. एक्स पार्टनरला बदनाम करण्याता प्रयत्न यामाध्यमातून केला जातो.

5/12

घाईत व्हिडीओ शेअर

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

कधीकधी यूजरला घाई महागात पडते.  बरेच यूजर्स आपले खासगी व्हिडीओ चुकीच्या क्रमांकावर पाठवतात.  त्यानंतर समोरची व्यक्ती तुम्ही पाठवलेल्या मेसेजचा गैरवापर करू शकते.

6/12

फिशिंग, सोशल इंजिनीअरिंग

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

सायबर गुन्हेगार अनेकदा स्मार्टफोन वापरकर्त्यांना लक्ष्य करतात. यासाठी ते तुम्हाला काही अॅप डाउनलोड करायला भाग पाडतात. एकदा तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड केलात की तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अलगद अडकत जाता. याला फिशिंग किंवा सोशल इंजिनिअरिंग असे नाव देण्यात आले आहे.

7/12

डिव्हाइस असे ठेवा सुरक्षित

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

तुमचा स्मार्टफोन लॉक करण्यासाठी पासवर्ड, पिनचा वापर करा. तुमच्या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टम आणि अॅप्स नियमितपणे अपडेट करत रहा.

8/12

अ‍ॅप परवानग्या

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

अ‍ॅप परवानग्या तपासून पाहा. काही अनावश्यक अ‍ॅप्स तुमच्या कॅमेरा किंवा स्टोरेजची परवानगी मागतात, ती देऊ नका.

9/12

एनक्रिप्शन सक्षम करा

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

केवळ अधिकृत वापरकर्ते तुमचा डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात, यासाठी एनक्रिप्शन सक्षम करा. यामुळे तुमचे डिव्‍हाइसेस आणि मेसेजिंग अॅप्स सुरक्षित राहतील.

10/12

प्रायव्हेट मेसेज अ‍ॅप्स

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

खासगी फोटो, व्हिडीओ डिजीटल प्लॅटफॉर्मवर शेअर करणे टाळा. WhatsApp  एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ऑफर करत असल्याची हमी देते.

11/12

सुरक्षित क्लाउड स्टोरेज

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

तुम्ही क्लाउडमध्ये खासगी व्हिडिओ आणि फोटो सेव्ह करत असाल कर क्लाउड स्टोरेजमध्ये सुरक्षित आहे का? याची खात्री करा. तुमच्या क्लाउड खात्यासाठी मजबूत पासवर्ड वापरा.

12/12

सुरक्षित वाय-फाय नेटवर्क

Private video MMS leaked Reasons Haking Cyber Crime Marathi News

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर  खासगी फोटो, व्हिडीओ शेअर करणे टाळा. कारण ते ते कमी सुरक्षित आणि हॅकिंगसाठी अधिक असुरक्षित असतात.