Happy Birthday Ratan Tata : आईवडील नव्हे, 'या' महिलेनं केलं रतन टाटांचं संगोपन

Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी ( Former Chairman Tata Group) असणाऱ्या  रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती... 

Dec 28, 2022, 11:08 AM IST

Businessman Ratan Tata Birthday: भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी असणाऱ्या  रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती... 

1/5

Ratan Tata Birthday: some lesser-known and interesting facts about Him

रतन टाटा यांचं बालपण फार रम्य नव्हतं. सधन कुटुंबातून असूनही त्यांच्या आईवडिलांमध्ये मतभेद असल्यामुळं ते लहान असतानाच मोठ्यांच्या नात्यात दुरावा आला होता. रतन टाटा यांचं संगोपन त्यांच्या आजीनं केलं होतं.   

2/5

Ratan Tata Birthday: some lesser-known and interesting facts about Him

टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू, नवल टाटा यांचे सुपुत्र म्हणजे रतन टाटा. ते अवघ्या 10 वर्षांचे असल्यापासून आजी नवाजबाई यांनी टाटा पॅलेसमध्ये त्यांना लहानाचं मोठं केलं

3/5

Ratan Tata Birthday: some lesser-known and interesting facts about Him

वयाच्या पंचविशीमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1962 मध्ये भारतात परतण्यापूर्वी त्यांनी लॉस एन्जेलिसमध्ये Jones and Emmons साठीही काम केलं होतं. 

4/5

Ratan Tata Birthday: some lesser-known and interesting facts about Him

भारताला पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कार देण्यामध्ये रतन टाटा यांचं मोलाचं योगदान 1998 मध्ये टाटा समुहाकडून इंडिका ही पहिली स्वदेशी कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती.   

5/5

Ratan Tata Birthday: some lesser-known and interesting facts about Him

Ratan Tata Birthday: some lesser-known and interesting facts about Him

रतन टाटा यांना बरेच छंद आहेत. त्यातलाच एक छंद आणि आवड म्हणून त्यांनी 2007 मध्ये F-16 फाल्कन (F-16 Falcon) उडवलं होतं. असं करणारे ते पहिलेवहिले भारतीय ठरले होते.