MS Dhoni आणि Yuvraj Singh यांनी निवृत्ती घेतली अन्...; आशिया कपपूर्वी आश्विन स्पष्टच बोलला!

आगामी आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? विकेटकीपर कोण असेल? याची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत. 

Aug 25, 2023, 20:00 PM IST

Ravi Ashwin, Asia Cup 2023: आगामी आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? विकेटकीपर कोण असेल? याची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत. 

1/5

आश्विन म्हणतो...

आशिया कप सामन्यासाठी आश्विनला संधी मिळाली नाही. त्यामुळे क्रिडाविश्वात रोष व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे आश्विन टीम इंडियाला गोल्डन रूट दाखवत असल्याचं पहायला मिळतंय. एका मुलाखतीत आश्विनने मोठं वक्तव्य केलं. काय म्हणतो आश्विन पाहूया...

2/5

बदलीच्या शोधात

युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यापासून भारतीय संघ त्यांच्या बदलीच्या शोधात आहे. केएल राहुलने सुरेख कामगिरी करून ती जागा भरून काढली होती. 

3/5

ऋषभ पंत

पाचव्या क्रमांकावरील केएल राहुलचे स्थान निश्चित झालं आहे आणि तो आमचा यष्टिरक्षक फलंदाजही आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीपूर्वी केएल राहुल हा पहिला यष्टीरक्षक होता.  

4/5

ईशान किशन

आता ईशान किशन हा दुसरा यष्टीरक्षक आहे. इशानने त्याला मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला, असं आश्विन म्हणतो.

5/5

केएल राहुल

केएल राहुलला थोडी समस्या आहे पण पहिल्या सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. तो फिट नसेल तर संजू सॅमसनही संघासोबत प्रवास करत आहे, असंही आश्विन म्हणतो.