PHOTO: कोणत्या महालापेक्षा कमी नाही आर अश्विनचं चेन्नईतील आलिशान घर, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल

Ravichandran Ashwin Luxurious Home Photos & Net Worth : भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बुधवारी 19 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ब्रिस्बेन येथील टेस्टच्या शेवटच्या दिवशी 38 वर्षांच्या अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. आर अश्विनचं क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं यादरम्यान त्याने कमावलेली एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. 

| Dec 20, 2024, 12:39 PM IST
1/8

रविचंद्रन अश्विन या भारताच्या स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण  765 विकेट्स घेतले आहेत. अश्विन हा टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. 

2/8

आर अश्विन हा गोलंदाजीतील सुपरस्टार असला तरी त्याचं राहणीमान, लाईफस्टाईल खूपच साधं आहे. मात्र असं असलं तरी अश्विन हा भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक आहे. अश्विनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर हे जरी 14 वर्षांचं असलं तरी त्यापूर्वीपासून अश्विन देशांतर्गत तसेच आयपीएल सामने देखील खेळत आहे. 

3/8

ब्रँड एंडोर्समेंट :

भारतातील श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असणारा अश्विनची एकूण संपत्ती ही जवळपास 135 कोटींची आहे. आर अश्विनच्या कमाईचा मुख्य स्रोत हा ब्रँड एंडोर्समेंट आहे. अश्विन अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसून येतो. ज्याच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतो. 

4/8

बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट :

रविचंद्रन अश्विन हा अनेक वर्षांपासून बीसीसीआय सेंट्रल  कॉन्ट्रॅक्टच्या टॉप कॅटेगरीतील खेळाडू आहे. ज्यामुळे त्याला प्रत्येक वर्षी बीसीसीआयकडून 5 कोटी एवढी रक्कम मिळायची. 

5/8

आयपीएल करिअर :

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आर अश्विन अगदी सुरुवातीपासूनच खेळतोय. त्याने चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या फ्रेंचायझीसाठी सुद्धा खेळला आहे. अश्विनला आयपीएल खेळण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींची फी मिळते.   

6/8

नुकत्याच 2025 साठी झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने फिरकी गोलंदाजांसाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली.यात नूर अहमदसाठी 10 कोटी तर रविचंद्रन अश्विनसाठी 9.75 कोटी खर्च केले. आयपीएल 2025 मध्ये आर अश्विन सीएसकेकडून खेळताना दिसेल. 

7/8

आर अश्विनने रियल एस्टेटमध्ये सुद्धा गुंतवणूक केली असून त्यामाध्यमातूनही तो मोठी कमाई करतो. चेन्नई येथे अश्विन आलिशान घरात राहतो. त्या घराची किंमत ही जवळपास 9 कोटी इतकी आहे. तो येथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. 

8/8

कार कलेक्शन :

अश्विनला लग्झरी गाड्यांचा सुद्धा शौक असून त्याच्याकडे 6 कोटींची रॉल्स रॉयस आहे. याशिवाय कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू 7 एसयूवी सुद्धा सामील असून याची किंमत ही 88 लाख रुपये आहे.