रविंद्र जडेजाने लेकीला दिलं अतिशय संस्कारी नाव, प्रत्येकालाच पडेल नावाची भुरळ

Ravindra Jadeja Name : रविंद्र जडेजाने लेकीला दिलंय अतिशय सुंदर नाव.. संस्कृती जपणाऱ्या या नावाचा अर्थ जाणून घ्या. 

Oct 11, 2023, 13:32 PM IST

Ravindra Jadeja Baby Name : वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात झाली आहे. आज भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचा देखील संघात सहभाग आहे. रविंद्र जडेजा हा त्याच्या खेळासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. रविंद्र जडेजाचं 17 एप्रिल 2016 रोजी रिवाबा यांच्याशी लग्न झालं. या दोघांना 2017 साली गोड मुलगी झाली. 

रविंद्र आणि रिवाबाने लेकीला अतिशय गोड नाव दिलं आहे. या नावाचा अर्थ अतिशय संस्कारी आहे. यासोबतच मुलींची इतर संस्कारी नावे देखील पाहू शकता. ज्या नावांची प्रत्येकालाच भुरळ पडेल यात शंका नाही. 

(फोटो सौजन्य- Ravindra Jadeja Instagram / iStock / Freepik.com

1/11

रविंद्र जडेजाच्या मुलीचे नाव

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

जडेजा या कुटुंबात 2017 साली लेकीचा जन्म झाला. त्याने लेकीला 'निध्याना' नाव दिलं आहे. हे नाव अतिशय गोड आहे. 'निध्याना' हे नाव हिंदू असून या नावाचा अर्थ खूप वेगळा आहे. 'निधान्या' या नावाचा अर्थ आहे अंर्तज्ञान, सहज ज्ञान. या नावाचा शुभांक आहे 4 असा आहे.   

2/11

ध्रुवी

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

रविंद्रच्या मुलीच्या नावाप्रमाणेच तुम्ही पुढील नावांचा विचार करू शकता. ध्रुवी हे देखील तसंच एक नाव आहे. या नावाचा अर्थ अतिशय दृढ, निश्चित असा आहे. ध्रुवी हे नाव दोन अक्षरी असून अतिशय छान आहे.   

3/11

ईश्वरी

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

'ई' या अक्षरावरून आपल्या मुलीला नाव ठेवायचं असेल तर या नावाचा विचार नक्की करू शकता. याचा अर्थ आहे अतिशय ताकदवान आणि देवी. तुम्हाला मुलीवर कायम परमेश्वराचा आर्शिवाद असावा अस वाटत असेल तर हे नाव नक्की ठेवा.   

4/11

ईरा

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

ईरा हे देखील वरील नावाप्रमाणे 'ई' अक्षरावरून असणारे नाव आहे. ईरा हे अतिशय छोटे नाव आहे. या नावाचा अर्थ आहे ज्ञान देणारी देवी सरस्वती. ज्या व्यक्तीला आपल्या मुलीचं नाव सरस्वतीच्या नावावरून ठेवायचं असेल ते याचा विचार करू शकतात. 

5/11

तारा

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

उंच, तारा, डोळ्याची बाहुली, भगवान बृहस्पतीची पत्नी असा तारा या नावाचा अर्थ आहे. हा अर्थ अतिशय खास असून दोन अक्षरी मुलीसाठी नाव शोधत असाल तर याची निवड करा. 

6/11

दिती

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

दिति म्हणजे तेज आणि तेज. याचा अर्थ उदार आणि उदारमतवादी असाही होतो. दिति हे दक्षाच्या मुलीचे नाव आहे, कश्यपाची पत्नी आणि राक्षसांची किंवा दैत्यांची आई. दोन अक्षरी अतिशय बोलायला सहज असलेल्या या नावाचा लेकीच्या नावासाठी नक्की विचार करू शकता.   

7/11

निहारिका

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

दव थेंब, ताऱ्याचे गुच्छ, तेजोमेघ, मिस्टी, दुधाळ मार्ग, जो खूप आकर्षक दिसतो, असा निहारिका या नावाचा अर्थ आहे. मुलीला अतिशय संस्कृतीने संपन्न असलेलं नाव द्यायचं असेल तर या नावाचा नक्की विचार करा. 

8/11

मैथिली

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

भगवान रामाची पत्नी सीता यांचं मैथिली हे नाव आहे. तुम्ही देखील मुलासाठी मैथिलीच्या नावाचा विचार करू शकतो. भारतीय आध्यात्मिक नावावरून हे नाव नक्कीच मुलीला देऊ शकता.   

9/11

प्रेमा

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

प्रेमाने मुलीला नाव ठेवायचं असेल तर या नावाचा नक्की विचार करा. प्रत्येक पालक मुलांवर खूप प्रेम करतात. या प्रेमाचा अर्थ जगाला कळावा यासाठी प्रेमा हे नाव नक्कीच ठेऊ शकता. प्रेमा म्हणजे स्नेह आणि प्रेम   

10/11

दिक्षा

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

दीक्षा, त्याग, समारंभाची तयारी, दीक्षा घेणारा, स्वावलंबी असा या नावाचा अर्थ आहे. दोन अक्षरी मुलीसाठी नावाचा विचार करत असाल तर दिक्षा हे नाव अतिशय सुंदर आहे. 

11/11

दुर्गा

Ravindra Jadeja Baby Girl Name from Sanskrit Know 10 Indian Unique Names And Meaning for Baby Girl

दुर्गा या शब्दाचा शाब्दिक अर्थ "अगम्य", "अजेय, अगम्य" असा होतो. हे दुर्ग शब्दाशी संबंधित आहे ज्याचा अर्थ "किल्ला,. तुम्ही संस्कृती जपणारे असाल किंवा गड-किल्ल्यांच्या प्रेमात असाल तर या नावाचा नक्की विचार करा.