5 महिन्यांनंतर Ravindra Jadeja चं जोरदार कमबॅक; 7 विकेट्स काढत केला कहर

जवळपास 5 महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा जोरदार केलं आहे. त्याच्या कामगिरीतून त्याने आपण 100 टक्के फीट असल्याचं दाखवून दिलं आहे. 

Jan 26, 2023, 22:06 PM IST
1/5

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज जवळ आली असून टीम इंडिया लवकरच तयारीला सुरुवात करणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांना यापूर्वीच आनंदाची बातमी मिळालीये. 

2/5

गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि त्यानंतर शस्त्रक्रियेमुळे 5 महिने मैदानाबाहेर असलेल्या या जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करत कमबॅकची घोषणा केली.

3/5

सौराष्ट्रकडून खेळताना जडेजाने तामिळनाडूविरुद्धच्या दुसऱ्या डावात 7 विकेट्स काढले. जडेजाच्या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्राने तामिळनाडूला केवळ 133 रन्समध्ये गुंडाळलं.  

4/5

जडेजानेही पहिल्या डावात 1 विकेट घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात त्याने कहर केला.

5/5

सप्टेंबर 2022 मध्ये एशिया कपदरम्यान जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो क्रिकेटपासून दूर होता.