HEALTH: 'ही' एक्टिव्हिटी आजच सुरू करा, नैराश्याला ठेवा तुमच्या आयुष्यापासून दूर

तरूणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत चालले आहेत त्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेणे आज सर्वाचे कर्तव्य आहे तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या या जीवनात नैराश्यापासून दूर राहण्यासाठी कोणती एक्टिव्हिटी फॉलो करू शकता. 

Jan 26, 2023, 21:06 PM IST

हल्ली वाढत्या स्पर्धेमुळे, आर्थिक ताणताणावामुळे आणि बदल्या जीवनशैली आणि नातेसंबंधांमुळे लोकांच्या जीवनात फार मोठ्या प्रमाणात नैराश्यालाही सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे आपल्याला त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा अशावेळी वेळीच उपाय सुरू करा आणि डिप्रेशनला हरवा. डान्स एक्टिव्हिटीज केल्यानं तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. 

1/5

HEALTH: 'ही' एक्टिव्हिटी आजच सुरू करा, नैराश्याला ठेवा तुमच्या आयुष्यापासून दूर

depression

आजकाल डिप्रेशनचं प्रमाण तरूणांमध्ये वाढू लागलं आहे त्यामुळे पालकांना आणि पाल्यांना याकडे दुर्लक्ष करू चालणार नाही. यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि सल्ला घेणे आवश्यक आहे. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी तुम्ही या एक्टिव्हिटीची तुमच्या दैनंदिन आयुष्यात भर करून शकता. 

2/5

HEALTH: 'ही' एक्टिव्हिटी आजच सुरू करा, नैराश्याला ठेवा तुमच्या आयुष्यापासून दूर

depression sysmtoms

डान्स करणं हे तुमच्या शारिरीक तसेच मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे तुम्ही आनंदी राहता आणि तुमच्या शरीराचा एकप्रकारे व्यायामही होतो. 

3/5

HEALTH: 'ही' एक्टिव्हिटी आजच सुरू करा, नैराश्याला ठेवा तुमच्या आयुष्यापासून दूर

happiness

डान्स हे मोठ्या प्रमाणात स्ट्रेटबस्टर आहे. डान्स केल्यानं तुमच्या मेंदूतील उदासीन भावना दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर एंडोर्फिन नामक एक उत्पादन वाढते. 

4/5

HEALTH: 'ही' एक्टिव्हिटी आजच सुरू करा, नैराश्याला ठेवा तुमच्या आयुष्यापासून दूर

how to overcome depression

ज्यांना असं वाटतंय की त्यांना नैराश्य सतावतं आहे तर त्यांनी अशावेळी डान्स ही एक्टिव्हीटी त्यांनी सुरू करावी. अशावेळी तुम्ही एरोबिक्सही करू शकता. 

5/5

HEALTH: 'ही' एक्टिव्हिटी आजच सुरू करा, नैराश्याला ठेवा तुमच्या आयुष्यापासून दूर

depression

डान्सनं शारीरिक आणि मानसिक तणाव वाढत नाहीत त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील नकारात्मकताही दूर होते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)