Hanuman Jayanti 2024 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील 'हे' सात फायदे
Hanuman Chalisa Benefit in Marathi : कलियुगातील एकमेव जागृत देवता म्हणून हनुमान जीची ओळख आहे. तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असा धर्मशास्त्राचा विश्वास आहे. तुम्ही दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. रामभक्त हनुमानजीची जयंती एप्रिल महिन्यात येणार आहे. रामनवमी नंतर हनुमान जयंती असणार आहे. 17 एप्रिल 2024 ला रामनवमी त्यानंतर 23 एप्रिल 2024 ला हनुमान जयंती असणार आहे. हिंदू धर्मात गणेश अथर्वशीर्ष पाठ आणि हनुमान चालीसा पाठ याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासोबत 7 फायदे होतात.