'शतकापेक्षा नमाज पठण करुन...'; भारतीय क्रिकेटरच्या विधानाने उंचावल्या भुवया! 8.40 कोटी, धोनी कनेक्शन

Namaz And Scoring Century: हा क्रिकेटपटू कायमच त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र तब्बल 8 कोटींहून अधिक रक्कम मोजून संघात स्थान दिलेल्या खेळाडूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानानने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...

Sep 03, 2024, 10:58 AM IST
1/10

sameerrizvi

हा खेळाडू त्याच्या कामगिरीमुळेच कायम चर्चेत असतो. मात्र यंदा त्याने केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाणून घेऊयात तो नक्की काय म्हणालाय....

2/10

sameerrizvi

इंडियन प्रिमिअर लिगमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याच्यासाठी 2024 च्या पर्वामध्ये चक्क 8.40 कोटी रुपये मोजले होते. सध्या हा कोट्यधीश खेळाडू त्याच्या एका विधानामुळे चांगलाच चर्चेत आहे.   

3/10

sameerrizvi

सध्या उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये खेळत असलेल्या या खेळाडूने मैदानाबाहेरील गोष्टींसाठी कधीच चर्चेत नसतो. मात्र यंदा असं नाहीये.   

4/10

sameerrizvi

उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टारचं कर्णधारपद हा खेळाडू भुषवत आहे. त्याने मागील 3 सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. मागील पर्वात त्याने या स्पर्धेमध्ये 2 शतकं झळकावली होती.

5/10

sameerrizvi

याच हरहुन्नरी खेळाडूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धार्मिक विषयावर भाष्य करताना नोंदवलेल्या प्रतिक्रियेवरुन अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत.  

6/10

sameerrizvi

आपण ज्या क्रिकेटपटूबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे समीर रिझवी! समीरने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपण धर्माला मानणारे व्यक्ती असून रोज नमाज पठण करतो असं म्हटलं आहे. (या फोटोमध्ये धोनी आणि ऋतुराज गायकवाडच्या मध्ये समीर रिझवी दिसत आहे)  

7/10

sameerrizvi

शतक झळकावल्यानंतर मिळणाऱ्या समाधानापेक्षाही नमाज पठण करुन मिळणारं समाधान हे मोठं असल्याचं समीरने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. आपल्या मुलाखतीमध्ये समीरने महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली आणि चेन्नईचा संघ आपले आदर्श असल्याचं म्हटलं आहे.

8/10

sameerrizvi

आपलं कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या कोणत्याही संघातून खेळण्यास आपण उत्सुक असून त्यासाठी किती पैसे मिळतात हे महत्त्वाचं नसल्याचं म्हटलं आहे. 

9/10

sameerrizvi

पुन्हा 2025 च्या पर्वामध्ये आपल्याला चेन्नईकडून रिटेन केलं जाणार आहे की नाही याबद्दल कोणतीही चर्चा संघाबरोबर केलेली नाही असं समीर म्हणाला. मात्र खेळामधील आर्थिक बाब हा आपल्यासाठी प्राथमिक मुद्दा नसल्याचं त्याने नमूद केलं आहे.  

10/10

sameerrizvi

2024 च्या आयपीएलमध्ये आठ समान्यांमध्ये समीरला केवळ 51 दावा करता आल्या होत्या. मात्र आपल्याला नक्कीच चांगली संधी आगामी आयपीएलमध्ये मिळेल असा त्याला विश्वास आहे.