रात्रंदिवस सुरू असलेल्या एसीमुळं येतंय भरमसाठ विजेचे बिल; आजपासूनच या टिप्स फॉलो करा

राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान ३० अंशाच्याही पुढे गेले आहे. घामाच्या धारा लागल्या अशताना लोक एसीचा सहारा घेताना दिसत आहेत. 

May 26, 2023, 20:26 PM IST

राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान ३० अंशाच्याही पुढे गेले आहे. घामाच्या धारा लागल्या अशताना लोक एसीचा सहारा घेताना दिसत आहेत. 

1/6

reduce ac electricity bill and cool faster using these tips

रात्रंदिवस सुरू असलेल्या एसीमुळं येतंय भरमसाठ विजेचे बिल; आजपासूनच या टिप्स फॉलो करा

उकाड्याने जीव हैराण झाला आहे. बाहेरुन घरात आल्यानंतर आपसूकच हात एसीच्या रिमोटकडे वळतात. तापमानात वाढ होत असताना घरात दिवसरात्र एसी सुरू असतो. मात्र, त्यामुळं वीजेचं बीलदेखील दुप्पट-तिप्पट येऊ शकते. त्यासाठीच उकाड्यातही तुम्ही एसीचं बिल कमी करु शकता?  कसं हा प्रश्न तुम्हालाही पडलाय मग जाणून घ्या या पाच टिप्स

2/6

reduce ac electricity bill and cool faster using these tips

नॉर्मल टेम्परेचर

एका अहवालानुसार, एसीचे २४ डिग्री तापमान तुमच्या खोलीसाठी अगदी परफेक्ट आहे. तापमान २४ ठेवल्यास एसीच्या मशीनवर जास्त लोड येणार नाही. त्याचबरोबर तुमचे विजेचं बिलदेखील कमी येईल   

3/6

reduce ac electricity bill and cool faster using these tips

एसी सर्व्हिसिंग

एसी वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. काही जण पैशांची बचत करण्यासाठी एसी सर्व्हिसिंग करुन घेत नाहीत. पण त्यामुळं हळूहळू एसीची मशीन खराब होऊ शकते. 

4/6

reduce ac electricity bill and cool faster using these tips

फिल्टर साफ करणे

एसीची सर्व्हिसिंग सहा महिन्यातून दोनदा तरी करण्यात यावी. तर, एसीत बसवण्यात आलेल्या फिल्डरची साफसफाई प्रत्येक महिन्याला किंवा थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने करावी. फिल्टरमध्ये खूप जास्त घाण जमा झाल्याने ते नीट काम करत नाहीत. त्यामुळं घरात पुरेसा थंडावा निर्माण होण्यास अडचण होते. व जास्त विजेचादेखील वापर होते. त्यामुळं एसी फिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे

5/6

reduce ac electricity bill and cool faster using these tips

खिडकी- दरवाजे बंद ठेवा

एसीची हवा प्रत्येक कानाकोपऱ्यात लागावी यासाठी घरातील खिडकी-दरवाजे बंद ठेवा. त्यामुळं लवकर घरात थंडावा निर्माण होईल व विजेची बचतही होईल. त्यामुळं विजेचे बिल कमी येईल.   

6/6

reduce ac electricity bill and cool faster using these tips

एसी मोड

तुमच्या एसी युनिडवर अनेक पर्याय दिले असतात. त्यात ८०, ६० आणि २५ टक्के सारखे विविध मोड दिले आहेत. यामुळं विजेची बचत होते.