Lionel Messi ला नडणं महागात पडलं; फिफाने कारवाई करत स्पर्धेबाहेर काढलं

FIFA Referee Controversy: कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा (FIFA World Cup 2022) पहिला उपांत्य सामना मंगळवारी रात्री उशिरा खेळला गेला. अर्जेंटिना आणि क्रोएशिया (Argentina v Croatia) यांच्यात हा सामना झाला असून अर्जेंटीनाने फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्आन या सामन्यापूर्वीही वाद निर्माण झाला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) तक्रारीवरून फिफाने रेफरी Mateu Lahoz यांच्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. 

Dec 14, 2022, 22:10 PM IST
1/5

कतार फिफा वर्ल्डकप पहिल्या उपांत्य फेरीत स्टार लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियाशी झाला. यामध्ये मेस्सीच्या टीमने 2018 चा पराभवाचा वचपा काढत 3-0 ने क्रोएशियाचा पराभव केला.

2/5

दरम्यान सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी एका मोठा वाद निर्णाण झाला.  रेफरी Mateu Lahoz यांच्याविषयी हा वाद आहे.

3/5

मेस्सीने रेफ्री Mateu Lahoz यांच्याबद्दल तक्रार केली होती. दरम्यान यावर सुनावणी म्हणून फिफाने कठोर पावले उचलत रेफ्रीला वर्ल्डकपच्या बाहेर काढलंय

4/5

अर्जेंटिना आणि नीदरलँड्स यांच्यात सामना रंगला होता, त्यावेळी Mateu Lahoz रेफरी होते. या सामन्यात मेस्सीसह इतर अनेक खेळाडूंसोबत त्यांचं शाब्दिक बाचाबाची झाली होती. 

5/5

नेदरलँड्सविरूद्ध झालेल्या सामन्यात रेफरी Mateu Lahoz 1-2 नाही तर एकूण 15 यलो कार्ड खेळाडूंना दाखवले होते. रेफरीने घेतलेले काही निर्णय असे होते, ज्यामुळे मारामारीची परिस्थिती निर्माण झाली होती.