Reheating Food Side Effects : सावधान..! 'हे' पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, अन्यथा जीव येईल धोक्यात!

Reheating Food Side Effects : अनेकदा आपण उरलेले अन्नपदार्थ पुन्हा गरम करून खात असतो. मायक्रोवेव्ह आल्यापासून लोकांना ही वाईट सवय जडली आहे. मायक्रोवेव्हच्या लोकप्रियतेनंतर उरलेले अन्न जणू जीवन रक्षकच बनले आहे. तुम्हाला फक्त अन्न गरम करून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. भूक भागवण्याचा हा सर्वात जलद आणि सोपा मार्ग आहे. पण तुम्हाला माहित आहे का तुमची ही सवय तुमच्या अन्नातील पौष्टिक मूल्य तर खराब करतेच पण तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते. काही उरलेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

Feb 19, 2023, 13:38 PM IST
1/5

मशरूम

आदल्या दिवशीचे मशरूम उद्या खाण्यासाठी साठवून ठेवण्याची चूक विसरूनही करू नका. मशरूम हा प्रोटिनचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि त्यात खनिज पदार्थ खूप चांगले असतात. परंतु असे पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीन्स अनेक भागांमध्ये तुटली जातात. ज्यामध्ये विषारी पदार्थ तयार होतात. हे पदार्थ पचनसंस्थेचे नुकसान करण्यासाठी जबाबदार असतात.  

2/5

मांसाहारी जेवण

शिळे मांसाहारी पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ले तर अन्नातून विषबाधा (food poisoning) आणि पचनास त्रास होऊ शकतो. त्यामुळे मांसाहारी पदार्थ नेहमी ताजेच खावेत. तज्ज्ञांच्या मते, या उच्च प्रथिनयुक्त (high protein) अन्नामध्ये नायट्रोजन असते, जे पुन्हा गरम केल्यास हानिकारक ठरू शकते.

3/5

भात

भूक लागल्यावर उरलेला शिळा भात डाळ किंवा भाजीसोबत खातात. पण शिळा भात पुन्हा गरम केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. भात पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये बॅसिलस सेरियस नावाचे अधिक प्रतिरोधक बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते.

4/5

नायट्रेटने समृद्ध असणारे पदार्थ

पालक, हिरव्या पालेभाज्या, गाजर, सलगम, बीटरूट यांसारख्या नायट्रेट्सने समृद्ध असलेल्या भाज्या नेहमी पुन्हा गरम करणे कटाक्षाने टाळावे. ते पुन्हा गरम केल्याने नायट्रेट्समध्ये आणि नंतर नायट्रोजनेजमध्ये रूपांतरित केले जातात. जे तुमच्या शरीराच्या ऊतींसाठी (tissues) हानिकारक ठरू शकतात. 

5/5

बटाटा

बटाटे वारंवार गरम केल्यास त्यात क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचे बॅक्टेरिया वाढू लागतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी-6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात. परंतु यापासून बनलेले पदार्थ वारंवार गरम केल्याने हे सर्व पोषक घटक नष्ट होतात. यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.