Relationship Tips:जोडीदाराचे 'असे' वागणे अजिबात सहन करू नका, कधी ब्रेकअप करणे योग्य? जाणून घ्या

नात्यात प्रेम असणं महत्त्वाचं आहे पण एकमेकांवर विश्वास असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

| Jul 06, 2023, 16:04 PM IST

Relationship Tips: नात्यात प्रेम असणं महत्त्वाचं आहे पण एकमेकांवर विश्वास असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 
एकमेकांना नात्यात बांधून ठेवून नात्यात दुरावा निर्माण होतो. असं केल्यास नातं कधी तुटण्याच्या उंबरठ्यावर येईल, हे कळणारही नाही.

1/6

Relationship Tips:जोडीदाराची 'अशी' वागणूक अजिबात सहन करू नका, कधी ब्रेकअप करणे योग्य? जाणून घ्या

Relationship Tips Do not tolerate this behavior of partner right time to breakup in love life

Relationship Tips: नात्यात प्रेम असणं महत्त्वाचं आहे पण एकमेकांवर विश्वास असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.  एकमेकांना नात्यात बांधून ठेवून नात्यात दुरावा निर्माण होतो. असं केल्यास नातं कधी तुटण्याच्या उंबरठ्यावर येईल, हे कळणारही नाही. 

2/6

दुर्लक्ष करण्याची चूक

Relationship Tips Do not tolerate this behavior of partner right time to breakup in love life

आजकाल तरुण-तरुणींचे प्रेम सुरु झाल्याच्या कमी कालावधीतच ते तुटण्याची अनेक प्रकरणे समोर येतात. जोडीदाराच्या काही वाईट सवयींकडे दुर्लक्ष करणे, हे त्यामागचे एक महत्वाचे कारण ठरते. जोडीदाराकडे दुर्लक्ष करण्याची ही चूक भविष्यात जड जाऊ शकते.

3/6

तर ब्रेकअप हाच उपाय

Relationship Tips Do not tolerate this behavior of partner right time to breakup in love life

व्यसनाधिन असणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मारहाण करणे अशा सवयी असतील तर ब्रेकअप हाच उपाय आहे. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.   

4/6

खोटे बोलणे

Relationship Tips Do not tolerate this behavior of partner right time to breakup in love life

तुमचा पार्टनर कोणत्याही कारणाशिवाय वारंवार खोटे बोलतो.  तुमची फसवणूक करत असताना तो पकडला जातोय. तर समजून घ्या की नाते बिघडत आहे. एक छोटंसं खोटं कधी मोठी फसवणूक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नाते सोडणे योग्य ठरेल.

5/6

सतत एक्स बद्दल बोलणे

Relationship Tips Do not tolerate this behavior of partner right time to breakup in love life

एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना, जर तुमचा पार्टनर त्याच्या एक्सची वारंवार आठवत काढत असेल किंवा तुमच्याशी तिची तुलना करत असेल तर वेळीच सावध व्हा. त्यांच्या या सवयीमुळे नाते आणखी बिघडते. अशा परिस्थितीत नातेसंबंधातून बाहेर पडणे चांगले.

6/6

नेहमी भांडण

Relationship Tips Do not tolerate this behavior of partner right time to breakup in love life

जर तुमचा जोडीदार नेहमी भांडणच करत असेल, तर समजून घ्या की नातेसंबंधाचा अंत सुरू झाला आहे. काहीतरी कारण शोधून सतत भांडत राहणे तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते. असे नाते वेळीच सोडणे योग्य ठरेल.