Relationship Tips: चुकूनंही तुमच्या पार्टनरला करू नका 'असा' मेसेज; नात्यात येऊ शकतो दुरावा

Relationship Tips: प्रत्येक व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सर्वाधिक वेळ आपल्या पार्टनरसोबत व्यतीत करावासा वाटतो. यावेळी मेसेज किंवा फोनवर आपण पार्टनरशी खूप बोलतो.

| Aug 27, 2023, 20:32 PM IST
1/5

काही मेसेज असे असतात जे तुम्ही तुमच्या पार्टनरला चुकूनही पाठवू नयेत. कदाचित अशा मेसेजमुळे तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर जाईल.

2/5

सतत प्रश्न विचारणं

सतत प्रश्न विचारणं

ज्यावेळी तुम्ही रिलेशनशिपमध्ये येता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं. यावेळी दिवसातून अनेक वेळा तुम्ही त्याला 'तू कुठे आहेस' असा सेमेज पाठवता. एक-दोनदा किंवा तीनदा, तुमचा पार्टनर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, पण वारंवार असे केल्याने त्याचा राग येऊ शकतो.

3/5

मोठा संवाद

मोठा संवाद

अनेक कपल मेसेजच्या माध्यमातून लांबलचक संवाद साधतात. ते मेसेजद्वारे ते अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, जे तुमच्या जोडीदाराला तुमच्यापासून दूर नेण्याचे काम करू शकतात.

4/5

मेसेज करण्याची पद्धत

मेसेज करण्याची पद्धत

तुमचा पार्टनर तुमच्याशी मेसेजमध्ये बोलत असतो पण यावेळी तुम्ही हम्म किंवा ओके मध्ये उत्तर देता. या प्रकारच्या उत्तरामुळे तुमच्या जोडीदाराला असं वाटतं की, तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही. अशाने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

5/5

सतत मेसेज करणं

सतत मेसेज करणं

ज्यावेळी पार्टनर तुमचा मेसेज किंवा कॉल घेत नाही, तेव्हा तुम्ही सतत मेसेज करत राहता. मात्र असं केल्याने तुमचा पार्टनर वैतागून नाराज होण्याची शक्यता असते.