...तर बँकांना दिवसाला 10 हजारांचा दंड; कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हिताचा निर्णय
पूर्ण कर्ज फेडल्यास तारण ठेवलेली कागदपत्रं ३० दिवसांत परत देणं बँकांना बंधनकारक करण्यात आलेय. टाळाटाळ केल्यास दिवसाला पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
RBI : बँकेकडून घेतलेलं गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा तारण कर्ज फेडलं तर संबंधित बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची कागदपत्रं 30 दिवसांत ग्राहकाला परत करावी लागणार आहेत. तसा आदेश रिझर्व्ह बँकेनं जारी केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्रं देण्यास टाळाटाळ करणा-या बँकांना दररोज 5 हजार रुपये याप्रमाणं दंड आकारण्याचा सज्जड इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.