टीव्हीवरील सर्व चॅनेल्स मोबाईलवर इंटरनेटविना पाहता येणार; काय आहे D2M?

केंद्र सरकार आणि आयआयटी कानपूरकडून डायरेक्ट टू मोबाईल तंत्रज्ञानावर संशोधन सुरु आहे. यामुळे मोबाईलवर इंटरनेटशिवाय ओटीटी चॅनल्स पाहता येणार आहेत. 

Aug 08, 2023, 21:21 PM IST

Live tv On Mobile : टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता मोबाईलवर आणि तेही इंटरनेटविना पाहता येऊ शकतात. कारण डीटूएच अर्थात डायरेक्ट टू होम तंत्रज्ञानाच्या धर्तीवर डायरेक्ट टू मोबाईल प्रणालीसाठी संशोधन सुरु आहे. यामुळे आता मोबाईलवर टीव्हीचा आनंद लुटता येणार आहे.

1/6

स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय लाइव्ह टीव्ही आणि चित्रपट पाहता येणार आहेत.

2/6

डीटूएच अर्थात डायरेक्ट टू होम तंत्रज्ञानाच्या धर्तीवर डायरेक्ट टू मोबाईल प्रणालीसाठी संशोधन सुरु आहे.

3/6

टेलिकॉम कंपन्या सरकारच्या या प्रस्तावाविरोधात आहेत.   

4/6

मोबाईलवर 80 टक्के इंटरनेट हे व्हिडीओ पाहण्यासाठी होते. त्यामुळे विना इंटरनेट टीव्ही पाहण्याची सुविधा मिळाल्यास मोठा फरक पडणार आहे. 

5/6

 ग्राहकांना मोबाईलवर विना इंटरनेट डायरेक्ट टीव्ही सुविधा मिळाणार आहे. 

6/6

केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर यावर संशोधन करत आहेत.