मुंबईतील सर्वात श्रीमंत GSB गणपती; 67 किलो सोनं आणि 325 किलो चांदीच्या आभूषणाने बाप्पाची सजावट

मुंबईत जीएसबी गणपतीही मंडपात विराजमान झालाय. मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती अशी त्याची ओळख आहे.

Sep 19, 2023, 18:02 PM IST

GSB Ganpati 2023 : जीएसबी सेवा मंडळ किंग सर्कल येथील गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती आहे. या गणपतीला 67 किलो सोनं आणि 325 किलो चांदीच्या आभूषणाने सजवण्यात आले आहे. या बाप्पाते दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होवू लागली आहे. 

1/7

67 किलो सोनं आणि 325 किलो चांदीच्या आभूषणाने GSB मंडळाच्या बाप्पाची सजावट करण्यात आली आहे.

2/7

इच्छापूर्ती गणेश म्हणून याची ओळख आहे. भक्त श्रद्धेने सोन्या चांदीचे दान करतात असे येथील पुजारी सांगतात.

3/7

जीएसबी लोकं इकडे आपली प्रतिष्ठा, पद विसरून गणेशाची सेवा करण्यासाठी उपस्थित असतात.

4/7

सुवर्ण गणेश म्हणून ओळख असलेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी दूरदूरहून गणेश भक्त येतात.

5/7

जीएसबी महागणपती हा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. दरवर्षी मंडळाच्या वतीने गणपतीचा विमा काढण्यात येतो पण यंदाच्या विम्याच्या रकमेने सर्व विक्रम मोडले आहेत.

6/7

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणा-या जीएसबी गणपती सेवा मंडळाने यंदा तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढला आहे. 

7/7

मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळ किंग सर्कल मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणूनही हे मंडळ ओळखलं जातं.