रॉयल इन्फिल्ड 1986 मध्ये मिळायची 'इतक्या' किंमतीत, तुमचा विश्वासच नाही बसणार

रॉयल एनफील्ड बुलेट 1986 मध्ये फक्त एनफील्ड बुलेट म्हणून ओळखली जात होती. त्यावेळी देखील मजबूत गुणवत्ता आणि विश्वासार्हता हीच तिची ओळख होती. भारतीय सैन्याकडून सीमा भागात गस्त घालण्यासाठी एनफील्ड वापरली जायची.

| Aug 13, 2023, 10:52 AM IST

Royal Enfield: रॉयल एनफील्ड बुलेट 1986 मध्ये फक्त एनफील्ड बुलेट म्हणून ओळखली जात होती. त्यावेळी देखील मजबूत गुणवत्ता आणि विश्वासार्हता हीच तिची ओळख होती. भारतीय सैन्याकडून सीमा भागात गस्त घालण्यासाठी एनफील्ड वापरली जायची.

1/7

Royal Enfield Bullet: 80 च्या दशकातील शान बनलेली रॉयल एनफील्ड बुलेट आजही लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. या कंपनीची बुलेट विकत चालवणाऱ्यालाही 'रॉयल लूक' मिळतो. त्यामुळे लोकांना ती खरेदी करायला जास्त आवडते. 

2/7

किमतीतही वाढ

Royal Enfield Bullet 350cc cost in 1886 know details

लोकांची वाढती पसंती पाहून कंपनीने आपल्या फीचर्समध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. त्यामुळे त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. एक काळ असा होता जेव्हा ही रॉयल एनफिल्ड बाईक अत्यंत कमी किमतीत विकली जात होती.

3/7

फोटो खूप व्हायरल

Royal Enfield Bullet 350cc cost in 1886 know details

सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 80 च्या दशकातील रॉयल एनफील्ड बुलेट 350 चा लुक दिसत आहे. ही बाईक जी 1986 मध्ये फक्त शाही घरांमध्ये दिसायची. त्यावेळी या बाईकची किंमत काय असू शकते हे तुम्ही सांगू शकाल का?

4/7

एनफील्ड बुलेट 350

Royal Enfield Bullet 350cc cost in 1886 know details

सोशल मीडियावर 1986 मध्ये खरेदी केलेल्या रॉयल एनफील्ड बुलेट 350 सोबत, त्याचे बील देखील खूप व्हायरल होत आहे. या बिलातील बाईकची किंमत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

5/7

ऑन रोड किंमत

Royal Enfield Bullet 350cc cost in 1886 know details

या बिलात बाइकची ऑन रोड किंमत फक्त 18,700 रुपये होती. हे बील 1986 चे म्हणजे 36 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. रॉयल एनफील्ड बुलेट 350 स्टँडर्ड मॉडेलचे व्हायरल बिल झारखंडमधील संदीप ऑटो कंपनीने जारी केले.

6/7

मजबूत गुणवत्ता आणि विश्वासार्हता

Royal Enfield Bullet 350cc cost in 1886 know details

रॉयल एनफील्ड बुलेट 1986 मध्ये फक्त एनफील्ड बुलेट म्हणून ओळखली जात होती. त्यावेळी देखील मजबूत गुणवत्ता आणि विश्वासार्हता हीच तिची ओळख होती. भारतीय सैन्याकडून सीमा भागात गस्त घालण्यासाठी एनफील्ड वापरली जायची.

7/7

नवीन बुलेट लॉन्च

Royal Enfield Bullet 350cc cost in 1886 know details

रॉयल एनफील्ड बुलेट ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात जुन्या बाइक्सपैकी एक आहे. कंपनी लवकरच भारतात 650cc इंजिनसह एक नवीन बुलेट लॉन्च करण्याच्या प्लानिंगमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत, रॉयल एनफील्ड बुलेट केवळ 350cc आणि 500cc इंजिनमध्ये   उपलब्ध आहे.