Royal Enfield Super Meteor 650 | बाईक प्रेमींसाठी जबरदस्त बातमी, सुपर मेटीयॉर 650 चं बुकिंग झालं सुरु

Nov 21, 2022, 18:30 PM IST
1/5

Super Meteor 650 Pre-Bookings: रायडर्सच्या अत्यंत आवडीचा ब्रँड 'रॉयल एन्फिल्ड' बाजारात नवी सुपर मेटीयॉर 650 सीसी बाईक लॉन्च करणार आहे.  या आधी कंपनीने 350 आणि 500 CC च्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. 650 कसा सेगमेंटमध्ये रॉयल एन्फिल्ड आता पदार्पण करणार आहे. Royal Enfield ने Super Meteor 650 बाईक गोव्यातील Rider Mania कार्यक्रमात सर्वात आधी सादर केली. ही एक क्रुझर बाईक असून भारतात याची ऑफिशियल बुकिंग सुरु झाली आहे.

2/5

नव्या क्रुझर बाइकमध्ये बाईकच्या फ्युएल टॅंकला टीअरड्रॉप डिझाईन देण्यात आलेली आहे. या बाईकची फ्युएल टॅंक कपॅसिटी 15.7 लिटरची असणार आहे. यामध्ये तुम्हाला जबरदस्त अशी स्लिक डिझाईन आणि स्प्लिट सीट सेटअप आहे.

3/5

मेटीयॉर 350 प्रमाणे याही बाइकमध्ये सर्क्युलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. या बाईकच्या फ्रंट डिस्कची लांबी 320mm तर रेअर डिस्कची लांबी 300mm आहे. यामध्ये ड्युअल चॅनेल ABS देखील असणार आहे. नव्या सुपर मेटीयॉर 650 ची लॉन्च डेट  अजून घोषित करण्यात आलेली नाही. 2023 मध्ये या बाईकची डिलेव्हरी सुरु होणार असल्याचा अंदाज आहे.  

4/5

भारतीय बाजारात ही बाईक दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होऊ शकते. पहिलं व्हर्जन स्टॅंडर्ड सुपर मेटीयॉर आणि दुसरं 650 टूरर मॉडेल असू शकतं. सुपर मेटीयॉर 650  ही बाईक पाच वेगवेगळ्या रंगात उलब्ध होणार आहे. ही बाईक ऍस्ट्रल ब्लॅक, ऍस्ट्रल ब्लु, ऍस्ट्रल ग्रीन, इंटस्ट्रेलर ग्रे आणि इंटस्ट्रेलर या रंगात उपलब्ध होईल. 

5/5

रॉयल एन्फिल्ड सुपर मेटीयॉर 650 ( Royal Enfield Super Meteor 650) बाईकमध्ये एअर ऍण्ड ऑईल कुल्ड इंजिन आहे. यामध्ये 47 हॉर्सपॉवर आणि 52 एनएम टॉर्क जनरेट करतं. हे रॉयल एन्फिल्डचं सर्वात भारी आणि सर्वात महाग मॉडेल असू शकतं. या बाईकची किंमत तब्बल 4 लाखांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे.