₹ 5700 कोटींचा मालक... सर्वात श्रीमंत MP केंद्रात मंत्री! मोदींनी सोपवली मोठी जबाबदारी; संपत्तीचा स्रोत..

Rs 5700 Crore Owner Richest Lok Sabha MP In Modi Cabinet: या नेत्याने त्याच्या पक्षासाठी थेट अमेरिकेतही काम केलं आहे. विशेष म्हणजे हा नेता भारतीय जनता पार्टीचा नसून एका स्थानिक पक्षाचा आहे. या नेत्यावर नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वातील नव्या मंत्रिमंडळामध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा नेता कोण आहे आणि त्याच्या 5700 कोटींच्या संपत्तीचा स्रोत काय आहे पाहूयात...

| Jun 11, 2024, 10:17 AM IST
1/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

तेलगू देसम पार्टीचे चंद्र शेखर पेम्मासानी हे लोकसभेची 2024 ची निवडणूक जिंकणारे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.   

2/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

विशेष म्हणजे चंद्र शेखर पेम्मासानी हे केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्रीही झाले आहेत.   

3/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

पेम्मासानी यांच्याकडे ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

4/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

चंद्र शेखर पेम्मासानी हे आंध्र प्रदेशमधील यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये घसघशीत यश मिळवणाऱ्या चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीचे गुंटूर मतदारसंघातील उमेदवार होते.  

5/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

गुंटूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्र शेखर पेम्मासानी यांना यंदा संधी देण्यात आली. त्यांना दोन वेळा खासदार राहिलेल्या जयदेव गल्ला यांच्या जागी पक्षाने तिकीट दिलं. गल्ला यांनी जानेवारी 2024 मध्ये सक्रीय राजकारण सोडल्याने चंद्र शेखर पेम्मासानी यांना तिकीट देण्यात आलं.

6/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

चंद्र शेखर पेम्मासानी यांनी गुंटूरमधून व्हायएसआर काँग्रेसच्या किलारी वेंकट रोसैया यांचा पराभव केला. चंद्र शेखर पेम्मासानी यांनी ही निवडून तब्बल 3 लाख 40 हजार मतांच्या मताधिक्याने जिंकली.  

7/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

'असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'ने विश्लेषण केलेल्या मतदान प्रतिज्ञापत्रांनुसार, 2024 च्या देशातील सार्वत्रिक निवडणुका लढवलेल्या 8,360 उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती ही पेम्मासानी यांच्याकडेच आहे.  

8/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या चंद्र शेखर पेम्मासानी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील बुरीपलेम गावातलाच आहे. पुढे त्यांनी पेनसिल्व्हेनियाच्या डॅनव्हिल येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमध्ये येथे शिक्षण घेतलं.  

9/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

चंद्र शेखर पेम्मासानी यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी-सिनाई हॉस्पिटलमध्ये सुमारे पाच वर्षे डॉक्टर म्हणून काम केले आहे, जिथे त्यांनी रहिवासी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवले.  

10/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

48 वर्षीय चंद्र शेखर पेम्मासानी हे राजकारणामध्ये सक्रीय असण्याबरोबरच UWorld या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आहेत. हीच कंपनी त्यांच्या कमाईचं मुख्य माध्यम आहे.   

11/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

चंद्र शेखर पेम्मासानी हे टीडीपीच्या एनआरआय सेलमधील सक्रिय नेते आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असताना त्यांनी तिथे टीडीपीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.  

12/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

चंद्र शेखर पेम्मासानी यांनी 2020 मध्ये अमेरिकेमध्ये तरुण उद्योजक म्हणून अर्न्स्ट आणि यंग पुरस्कार जिंकला आहे.  

13/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

टीडीपीसाठी लोकसभेची गुंटूरची जागा जिंकणारे चंद्र शेखर पेम्मासानी यांची एकूण संपत्ती 5700 कोटी रुपये इतकी आहे.   

14/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

चंद्र शेखर पेम्मासानी यांनी पेम्मासानी फाऊंडेशनची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.  

15/15

Rs 5700 Crore Chandra Sekhar Pemmasani

गुंटूर आणि नरसरावपेटमधील गावांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्याचं कामही चंद्र शेखर पेम्मासानी यांच्या संस्थेमार्फत केले जाते.