1 ऑगस्ट पासून होणार मोठे बदल, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर... कसं ते जाणून घ्या

Changes From 1st August :  या नव्या नियमांचा फटका थेट तुमच्या खिशाला बसणार आहे. याशिवाय बँकांनाही दर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात जास्त सुट्ट्या असणार आहेत. चला तर मग १ ऑगस्टपासून होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेऊया.

Jul 27, 2022, 19:53 PM IST

Changes From 1st August : ऑगस्ट महिना उंबरठ्यावर आला आहे. अशा परिस्थितीत 1 ऑगस्टपासून तुमच्या खिशात नेमके कोणते बदल होणार आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये एसपीजी गॅसची किंमत (LPG Gas Cylinder), बँकिंग चेकबुक आणि बँक सुट्ट्यांशी संबंधित काही अपडेट्सचा समावेश आहेत.

1/3

एलपीजीच्या किंमतीमध्ये वाढ

दर महिन्याच्या पहिल्या दिवसाप्रमाणे यंदाही १ ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करू शकतात. यावेळी एका सिलिंडरच्या दरात 20 ते 30 रुपयांनी बदल होऊ शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे. गेल्या वेळी व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता, तर घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी वाढला होता.

2/3

बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट सिस्टम

तुमचं खातं बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये असेल ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. येत्या १ ऑगस्टपासून बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये धनादेशाद्वारे पैसे भरण्याचे नियम बदलणार आहेत. आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना कळवलं आहे की 1 ऑगस्टपासून 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशांसाठी सकारात्मक वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेला धनादेशाशी संबंधित माहिती एसएमएस(SMS), नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल.  

3/3

बँका 18 दिवस बंद राहतील

यावेळी ऑगस्टमध्ये मोहरम (Muharram), रक्षाबंधन (Raksha Bandhan), स्वातंत्र्यदिन (Independence Day), कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami), गणेश चतुर्थी असे अनेक सण येत आहेत. त्यामुळे यावेळी विविध राज्यांसह एकूण 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देखील आपल्या यादीत जाहीर केलं आहे की ऑगस्टमध्ये बँक काही दिवस बंद राहणार आहे. या महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि चार रविवार असे एकूण 18 दिवस बँका बंद राहतील.