Sara Tendulkar : अगं अगं... जरा हळू, अतिउत्साहाच्या भरात सारा तेंडुलकरची पंचाईत, कसंबसं सावरलं...पाहा Video

Sara Tendulkar Video : क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) साराचे स्वत:चे लाखो फॅन फॉलअर्स (Followers) आहेत. सारा उच्चशिक्षित असून तीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तीने लंडनमध्ये वैद्यकिय पदवी घेतली. सारा लाईमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. 

Feb 05, 2023, 12:30 PM IST
1/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले विविध अॅक्टिव्हिटीचे फोटो ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. ज्याला चाहत्यांची लाखोंनी पसंती मिळते.

2/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

सोशल मीडियावर सारा तेंडुलकर अनेक दिग्गजांना टक्कर देते. इंस्टाग्रावर साराचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरून साराच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.  सारा, लोकप्रिय गायक जस्टिन बीबरची खूप मोठी चाहती आहे.

3/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

सारा आपल्या फिटनेसबाबतही नेहमीच सजग असते. याशिवाय तिला ट्रॅव्हलिंगची आवड आहे. अभ्यास, दैनंदिन कार्यक्रम या साऱ्यातून वेळ काढत ती अनेक वेळा विविध ठिकाणांना भेट देताना दिसते आणि याचे फोटो ती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करते.

4/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

नुकताच सारा तेंडुलकरने आपल्या डान्सचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडिओत ती काही डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केलं असून अनेक कमेंटही दिल्या आहेत. 

5/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

या व्हिडिओत तीने पर्पल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. या व्हिडिओला तीने एक कॅप्शनही दिला आहे. 'हा माझा हॅलोवीनचा आऊटफीट आहे आणि ही जुनी पोस्ट नाही' असं तीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.         View this post on Instagram                       A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

6/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापासून ते क्रिकेटर शुभमन गिलसोबत तीचं नाव जोडण्यापर्यंत अनेक अफवा पसरवल्या गेल्या. पण या सर्व अफवा आहेत. याबाबत स्वत: साराने किंवा सचिन तेंडुलकरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

7/7

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Dance Video Viral on Social Media

सारा तेंडुलकरने 2023 या नव्या वर्षात एक स्टार्टअप सुरु केला असून तीने डायरी छापली आहे. ही लिमिटेड एडिशन असून यात तीने हाताने लिहिलेल्या काही नोट्स आहेत. यासाठी तीने एक बेवसाईटही तयार केली असून Sara Tendulkar.in असं त्याचं नाव आहे. याची माहिती तीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर दिली होती.